The Emir of Bahrain Arrived in Dubai With His Robot Body Guard Viral Video: जाणून घ्या दुबई मध्ये हमाद बिन ईसा अल-खलीफा यांच्या व्हायरल व्हिडिओ मागील सत्य
सध्या सोशल मीडियामध्ये Emir of Bahrain, Hamad bin Isa Al Khalifa हे दुबई मध्ये रोबोट बॉडीगार्ड सोबत फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याला तुफान व्ह्युज देखील मिळाले आहेत.
सोशल मीडीया हा सध्या जगभरातील लोकांना माहिती मिळवण्याचा पर्याय आहे. त्याच्या माधयामातून एका क्लिकवर जगभरातील घडामोडींचे अपडेट्स ठेवता येतात. पण अनेकदा सोशल मीडियामध्ये माहितीची अधिकृतता न तपसता केवळ आंधळेपणाने फॉरवर्ड करण्याच्या वृत्तीमुळे अनेक चूकीच्या, खोट्या बातम्या देखील व्हायरल होत आहेत. लोकं देखील भोळेपणाने अशावर विश्वास ठेवत असल्याने सहज फेकन्यूजच्या जाळ्यात अडकतात. त्यामधूनच खोटं वृत्त, व्हिडिओ, मेसेज व्हायरल होतात. सध्या सोशल मीडियामध्ये Emir of Bahrain, Hamad bin Isa Al Khalifa हे दुबई मध्ये रोबोट बॉडीगार्ड सोबत फिरत असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्याला तुफान व्ह्युज देखील मिळाले आहेत. ट्विटर वर देखील अशाच प्रकारे बहरीनच्या महाराजाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. मात्र हा व्हायरल व्हिडिओ यंदाचा नसून 2019 मधील एका प्रदर्शनातील आहे. तर रोबोटच्या पुढे चालणारा माणूस देखील Emir of Bahrain नाही.
एका 30 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये गर्दीत एका माणसाच्या मागे भला मोठा रोबोट चालत असल्याचा व्हिडिओ आहे. दरम्यान लोकं देखील त्याचा फोटो क्लिक करण्यात गुंतल्याचं पहायला मिळत आहे. ट्वीटर वर अनेकांनी व्हिडिओमधील व्यक्ती Emir of Bahrain, Hamad bin Isa Al Khalifa असल्याचा दावा केला आहे. आणि त्याच्या सुरक्षेसाठी रोबोट आहे.
ट्वीट
The Video is From Last Year and It's Not Emir of Bahrain
इथे पहा जूना आणि मूळ व्हिडिओ
दरम्यान आता तुम्हांला खात्री झाली असेल की सध्या सोशल मीडियात व्हायरल झालेला व्हिडिओ हा बहरीनच्या महाराजाचा नसून तो एका एक्झिबशनमधील आहे. उत्साहाच्या भरात अनेकांनी अशाप्रकारे खोटे दावे करणारे व्हिडिओ शेअर केले असतील ट्वीट केले असतील पण त्यावर विश्वास ठेवून लगेच फॉर्वर्ड करू नका.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)