Fact Check: कार हिटमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होतो? गाडीमध्ये सॅनिटायझर ठेवणे कितीपत सुरक्षित? जाणून घ्या
त्यामुळेच हँड सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. दरम्यान तापमानही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होऊन कारमध्ये आग लागण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत
कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) जागतिक आरोग्य संकटामुळे सतत हात धुणे ही गरज झाली आहे. त्यामुळेच हँड सॅनिटायझरचा (Hand Sanitizer) वापर वाढला आहे. दरम्यान तापमानही सातत्याने वाढत आहे. त्यामुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होऊन कारमध्ये आग लागण्याच्या काही घटना समोर आल्या आहेत. या घटनानंतर हॅंड सॅनिटायझऱ कारमध्ये ठेवणे योग्य आहे की नाही? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. या प्रश्नाचे उत्तर युजर्स नेटवर शोधत आहेत.
अलिकडेच फेसबुकवर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात हँड सॅनिटायझरचा स्फोट होऊन कारला आग लागल्याचे दिसत आहे. परंतु, घाबरुन जाण्याचे काही कारण नाही. कारण हे सर्व दावे फेक आहेत. तापमान खूपच जास्त असल्याशिवाय हॅंड सॅनिटायझरचा स्फोट होत नाही. त्यामुळे कारमध्ये हँड सॅनिटायझरचा स्फोट होण्याची शक्यता खूप कमी आहे.
हँड सॅनिटायझरमुळे कारला आग लागल्याचा दावा करणारा एक व्हिडिओः
Fire Department's Warning:
बहुतांश सॅनिटायझर्स हे अल्कोहोल बेस्ड असतात. त्यामुळे ते ज्वलनशील असतात. असे सॅनिटायझर्स लायटर किंवा माचिसच्या जवळपास ठेवल्यास आग लागण्याची शक्यता असते. या सर्व गोष्टींमुळे नागरिकांचा नक्कीच गोंधळ उडू शकतो. त्यामुळे नागरिकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी National Fire Protection Association यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे. या व्हिडिओत गाडीतील उष्णतेमुळे हँड सॅनिटायझरचा स्फोट होऊ शकतो की नाही याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. हँड सॅनिटायझर हा अतिशय उष्ण तापमानात पेट घेऊ शकतो, असे याद्वारे सांगण्यात आले आहे.
पहा व्हिडिओ:
या अशा व्हायरल होणाऱ्या व्हिडिओजमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरु शकते. परंतु, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमधील अपघात हे हँड सॅनिटायझरमुळे झालेले नाहीत. तरी सुद्धा अल्कोहोल बेस्ड सॅनिटायझर वापरताना तुम्ही खबरदारी घेणे गरजेचे आहे. सॅनिटायझर थंड आणि कोरड्या वातावरणात ठेवावे, असे सॅनिटायझरच्या बॉटलवर लिहिलेले असते. परंतु, याचा अर्थ असा नाही की कारमध्ये हँड सॅनिटायझर ठेवल्याने त्याचा स्फोट होईल. सॅनिटायझर थेट सुर्यप्रकाशात ठेवल्यास त्याची निर्जंतुकीकरण क्षमता कमी होते. त्यामुळे सॅनिटायझर अति उष्ण तापमानात किंवा सुर्यप्रकाशात ठेवू नका.