Fact Check: कोरोनाच्या भीतीने बेल्जीयम मध्ये Group Sex वर सक्तीची बंदी? जाणून घ्या सत्य

यामागील सत्य आपण आता पाहणार आहोत.

Sex News | (Photo credit: archived, edited, symbolic images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढताा प्रादुर्भाव पाहता जगभरात संचारपासून ते जमवापर्यंत अनेक बाबतीत बंदी लागू करण्यात आली आहे. मात्र बेल्जीयम मध्ये एक अगदी वेगळाच नियम लागू केल्याचे वृत्त ऑनलाईन व्हायरल होत आहे. बेल्जीयम सरकारने अनावश्यक सामूहिक सेक्स वर बंदी आणायचे आदेश दिल्याचे  या वृत्तात म्हंटले आहे. या आर्टिकल मध्ये संबंधित आदेश आरोग्यमंत्री मॅगी डे ब्लॉक यांनी दिल्याचे सांगण्यात आले.  मागील काही तासांपासून हे आर्टिकल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मात्र खरोखरच असा काही नियम लागू करण्यात आला आहे का याविषयी लोकांमध्ये कुतुहूल होते, त्यातूनच केलेल्या या पडताळणीत हे आर्टिकल सपशेल खोटे असल्याचे सिद्ध झाले आहे. काय आहे या आर्टिकल? त्याची सत्यता किती आहे? हे आपण आता जाणून घेऊयात.. Fact Check: केळं खाऊन दूर होते कोरोना व्हायरसचे संक्रमण? पहा या व्हायरल व्हिडीओ मागील सत्य

संबंधित आर्टिकल मध्ये बेल्जीयमच्या आरोग्यमंत्री मॅगी यांचे नाव घेऊन प्रतिक्रिया छापण्यात आली आहे, " बेल्जीयम ही ग्रुप सेक्स ची युरोप मधील राजधानी आहे असे म्हणता येईल, मात्र  सध्या जगावर ओढवलेल्या कोरोनाच्या संकटात, जनतेने कमीत कमी संपर्क इतरांसोबत ठेवावा असे सांगण्यात येत आहे, त्यामुळे कोरोनापासून संरक्षणासाठी पुढील आदेश मिळेपर्यंत ग्रुप सेक्स, ऑर्गि (मोठा ग्रुप सेक्स), थ्री सम, वेगवेगळ्या पार्टनर सोबत सेक्स अशा अनावश्यक सेक्शुयल ऍक्टिव्हिटी बंद ठेवाव्यात" असे या आर्टिकल मध्ये म्हणण्यात आले होते. याच लेखात पुढे सांगितल्याप्रमाणे मॅगी डी ब्लॉक यांनी हस्तमैथुन, Anal Sex  किंवा Blowjobs तसेच नॉर्मल सेक्स वर बंदी घातलेली नाही असेही सांगण्यात आले आहे.

दरम्यान हे संपूर्ण आर्टिकल हे चुकीच्या माहितीवर आधारित आहे हे सिद्ध करणारे माध्यम सुद्धा स्वतः ही वेबसाईटचं आहे. वर्ल्ड न्यूज डेली रिपोर्ट,वेबसाईटच्या "where facts don't matter, claims to produce satirical content"  या टॅगलाईन नुसार या साईटवरील माहिती ही उपहासाने लिहिलेली असते त्यात कधीही कोणत्याही क्षणी बदल केला जाऊ शकतो, याकडे गंमत म्हणून पाहावे मात्र ही माहिती पूर्णतः बरोबर आहे असा दावा त्यांनी केलेला नाही. त्यामुळे व्हायरल होणाऱ्या आर्टिकल मागे काहीही तथ्य नाही हे स्पष्ट होते.