Elephant Rescue Raigarh: Thanks JCB! हत्तीच्या पिल्लाने मानले आभार; रायगड येथील मदतकार्याचा Video व्हायरल
छत्तीसगड राज्यातील रायगड जिल्ह्यात चिखलाच्या खड्ड्यात अडकलेल्या हत्तीच्या पिल्लाला ग्रामस्थ आणि वन अधिकाऱ्यांनी वाचवले. या मदतीबद्दल या पिल्लाने जेसीबीप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे वर्तन केले आहे. हा अतिशय हृदयस्पर्षी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
Baby Elephant JCB Hug: सोशल मीडियावर एका हृदयस्पर्षी व्हिडिओने (Animal Rescue Viral Video) अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे. ही घटना छत्तीसगड(Elephant Rescue Chhattisgarh) राज्यातील रायगड (Raigarh Elephant Viral Video) जिल्ह्यातील चिल्कगुडा गावात घडली. जंगलातील हत्तींचा एक कळप अंघोळ करण्यासाठी आणि पाण्यात डुंबण्यासाठी एका खोल खड्ड्यात उतरले होते. मात्र, थोड्या वेळाने सर्व मोठे हत्ती बाहेर आले. एका हत्तीचे पिल्लू मात्र चिखलाच्या खड्ड्यात तसेच अडकले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना प्रदीर्घ काळाने या पिल्लाची सुटका केली. या वेळी या पिल्लाने जेसीबीसोबत असे वर्तन केले. ज्यामुळे त्याने चक्क Thanks JCB! असेच म्हटले की काय, अशी चर्चा सुरु झाली आहे.
गावकरी आणि वन पथकाकडून हत्तीच्या पिल्लास मदत
पाण्यात आणि चिखलाच्या खड्ड्यात अडकलेले हत्तीचे पिल्लू मदतीसाठी ओरडत होते. हा आवाज ऐकूण जवळचे स्थानिक नागरिक धावत आले असता, त्यांना एक पिल्लू अडकलेले दिसले. जवळत हत्तींचा कळपही होता. या नागरिकांनी ताबडतोब वन विभागाला कळवले. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर एका जेसीबीस पाचारण करण्यात आले. स्थानिक गावकरी आणि वन अधिकाऱ्यांनी फावडे आणि जेसीबी मशीनचा वापर करून खड्ड्याचा कडा काळजीपूर्वक सपाट केला, ज्यामुळे खड्ड्याला सुरक्षितपणे बाहेर काढले. (हेही वाचा, Baby Elephant Viral Video: छोट्या हत्तीने केअरटेकरचा हात आपल्या सोंडेने धरून केले प्रेम व्यक्त, येथे पाहा व्हिडीओ)
हत्तीच्या पिल्लाने बचावकर्त्यांचे आणि जेसीबीचे आभार
चिखलाच्या खड्डयातून यशस्वीरित्या बाहेर पडल्यानंतर, हत्तीचे पिल्लू जेसीबी मशीनकडे चालत गेला आणि त्याच्या सोंडेने त्याला हळूवारपणे स्पर्श केला, ज्याला अनेकजण कृतज्ञतेचे संकेत म्हणत आहेत. छोट्या हत्तीने वाहनाला मिठी मारली आणि आनंदाने त्याच्या कळपात परतला.
व्हायरल व्हिडिओमुळे ऑनलाइन भावनिक प्रतिक्रिया
हत्तीचे हे भावनिक वर्तन व्हिडिओमध्ये कैद झाले आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल झाला. सोशल मीडिया वापरकर्त्यांनी हे फुटेज मोठ्या प्रमाणात शेअर केले आहे, गावकरी आणि वन कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या करुणेचे कौतुक केले आहे. हत्तीच्या त्याच्या बचावकर्त्यांशी असलेल्या भावनिक संबंधाने अनेक दर्शक प्रभावित झाले आहेत, अनेकांनी हत्तींच्या बुद्धिमत्तेवर आणि भावनिक खोलीवर भाष्य केले आहे.