Durex Condom ने दिवाळीच्या निमित्तावर शेअर केलेली जाहिरात पाहून नेटकरी भडकले; ट्विटर वरून व्यक्त केला संताप
पण ही ऍड शेअर करताच अनेकांनी यातून धार्मिक मानहानी केल्याचा दावा ठोकायला सुरुवात केली.
आजकाल जाहिरात म्हणजे कोणत्याही वस्तूच्या मार्केटिंगसाठी जादुई कांडी म्ह्णून सिद्ध होताना दिसून येते. किंबहुना म्ह्णूनच प्रत्येक सणाला किंवा खासां निमित्तावर प्रत्येक ब्रँड आपल्या वेगळ्या ढंगात जाहिरात करताना दिसून येतो. मात्र यावेळेस असा प्रकार करणे कसे आपल्याच अंगावर येते याचे उदाहरण ड्युरेक्स कंडोमच्या (Durex Condom) जाहिरातीमधून समोर आले आहे. सध्या भारतात दिवाळीचा (Diwali) मूड असल्याने ड्युरेक्सने देखील आपल्या विनोदी शैलीत एक ऍड प्रसिद्ध केली होती. पण ही ऍड शेअर करताच अनेकांनी यातून धार्मिक मानहानी केल्याचा दावा ठोकायला सुरुवात केली. अनेकांनी तर ही ऍड म्हणजे हिंदू धर्मियांचा आणि सणांचा अपमान असल्याचे म्हणत ड्युरेक्सच्या ऍडला सोशल मीडियावरून रिपोर्ट सुद्धा केले.
ड्युरेक्स कंपनी कडून दिवाळी विशेष ऍडच्या रूपात एका बॉटल मध्ये दोन रॉकेट दाखवत असे कॅप्शन देण्यात आले होते. वास्तविक यातून उपहास साधत विनोद करण्याचा हेतू असला तरी अशा प्रकारे एकाच धर्माचा भावना दुखावत टार्गेट करणे हे गैर आहे अशी उलट प्रतिक्रिया ड्युरेक्सला मिळाली. चला तर आधी पाहुयात काय होता हा एकूणच हंगामा..
ड्युरेक्स कॉन्डोम जाहिरात
नेटकऱ्यांचा संताप
दरम्यान, याआधी ड्युरेक्सने अनेक सामाजिक मुद्द्यांवर सुद्धा अशाच जाहिराती बनवल्या आहेत. मग ते ट्राफिक नियमांचे पालन करण्याचा संदेश असो वा सफर सेक्सचा सल्ला या जाहिरातींना लोकांनी देखील चांगली प्रतिक्रिया दिली होती. पण यावेळेस मात्र असं करणे ड्युरेक्सच्या अंगाशी आल्याचीच चिन्हे आहेत.