Video: दारूच्या नशेत तरुणाने गळ्यात गुंडाळला भलामोठा अजगर, पुढे जे झाले ते पाहून बसेल धक्का, पाहा व्हिडिओ

व्हिडीओमध्ये एका माणसाने त्याच्या गळ्यात एक मोठा अजगर गुंडाळला असून त्याचा मुलगा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. झारखंडमधील गढवा पोलीस स्टेशन हद्दीतील परिहार पंचायतीच्या किटासोती खुर्द गावातील ही घटना आहे, पाहा व्हिडीओ

Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये एका माणसाने त्याच्या गळ्यात एक मोठा अजगर गुंडाळला असून त्याचा मुलगा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. झारखंडमधील गढवा पोलीस स्टेशन हद्दीतील परिहार पंचायतीच्या किटासोती खुर्द गावातील ही घटना आहे. तो माणूस मासेमारीला गेला असताना त्याच्या गळ्याभोवती अजगराने पकड मजबूत केली. मिहिर झा नावाच्या युजरने ट्विटरवर शेअर केलेल्या क्लिपमध्ये बिरजलाल राम भुईया नावाचा माणूस अजगराच्या तावडीतून स्वत:ला सोडवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याने स्वत: मद्यधुंद अवस्थेत आपल्या गळ्यात साप गुंडाळला होता. त्यानंतर तो स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. काही वेळातच बिरजलालचा मुलगा आणि त्याचा मित्र धावत येऊन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतात आणि त्याला सापाच्या पकडीतून सोडवतात.

पाहा व्हिडीओ :  

व्हिडिओ थक्क करणारा आहे. वृत्तानुसार, वडिलांचा जीव वाचवण्यात मुलाला अखेर यश आले. या घटनेत बिरजलालला किरकोळ दुखापत झाली असली तरी गावातच त्याच्यावर उपचार करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे.