Dolphin in Vashi Creek: वाशी च्या खाडीमध्ये नागरिकांनी झाले डॉल्फिनचे दर्शन, व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून पाहा हा अद्भूत नजारा, Watch Video
अशातच सकाळी वाशीतील खाडीत मनसोक्त पाण्यात डुंबणारे डॉल्फिन पाहायला मिळाले. पाहा हा अद्भूत नजारा
पाण्याखालचे जग हे किती सुंदर आहे हे पाहण्याची सर्वांनाच उत्सुकता असते. या पाण्यात असणा-या जलाचरांच्या असंख्य प्रजाती पाहण्याची देखील कित्येकांना आवडत असते. यात डॉल्फिनचा (Dolphin) अथांग समुद्रात मनसोक्त डुंबतानाचा क्षण आपल्याला पाहायला मिळाल तर ते आपले भाग्यच म्हणावे लागेल. अनेक लोक कोकणात किंवा विदेशात जाऊन हा डॉल्फिन शो पाहतात. मात्र तेच दर्शन तुम्हाला मुंबईतच झालं तर? ऐकून विश्वास बसणार नाही पण असे घडले आहे. वाशीतील विशाल खाडीत (Vashi Creek) नागरिकांना डॉल्फिनचे दर्शन झाले आहे. हा नजारा इतका विलोभनीय होता की प्रत्यक्षदर्शींनी याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मिडियावर शेअर केला. तो व्हिडिओ आता सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.
मुंबईत डॉल्फिनचे दर्शन होणे ही फारच दुर्मिळ गोष्ट आहे. अशातच सकाळी वाशीतील खाडीत मनसोक्त पाण्यात डुंबणारे डॉल्फिन पाहायला मिळाले. पाहा हा अद्भूत नजारा
हेदेखील वाचा- केरळ: मच्छिमा-यांच्या जाळ्यात अडकलेला महाकाय देवमासा पुन्हा सोडला समुद्रात, नेटक-यांकडून होतोय कौतुकाचा वर्षाव
हा व्हिडिओ 8 डिसेंबरचा असून सकाळच्या सुमारास अचानक नागरिकांनी वाशीच्या या विशाल खाडीत डॉल्फिनचे दर्शन झाले. हे पाहून अनेकांना आनंद झाला. डॉल्फिनचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. डॉल्फिनचा पाण्यात मनसोक्त उड्या मारतानाचा व्हिडिओ आपण केवळ बघतो. पण त्यातून काही शिकत नाही. यावरून एक गोष्ट शिकण्यासारखी आहे. आपल्याला देवाने दिलेले आयुष्य खूप सुंदर आहे ते तितकेच सुंदर आणि स्वच्छंद होऊन जगावे आणि प्रत्येक क्षण जगावा. कारण ज्या खाडीत अनेकदा लोक आपले जीवन संपवतात त्याच खाडीत डॉल्फिनचा हा व्हिडिओ खूप काही शिकवून जातो. नाही का!!