ग्राहकाच्या पिझ्झावर थुंकला डिलीवरी बॉय, होऊ शकते 18 वर्षे कारागृहाची शिक्षा, तुर्की येथील घटना

या सीसीटीव्ही फुटेजमध्ये डिलीवरी बॉय थुंकताना दिसतो. आरोपीची ओळख बुरक एस अशी झाली आहे. धक्कादायक म्हणजे थुंकण्याचे कृत्य करताना आरोपी स्वत:च्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण करत असल्याचेही दिसते.

Pizza Delivery Man | (Photo credit: archived, edited, symbolic images)

एक पिझ्झा डिलीवरी बॉय (Pizza Delivery Man) आपल्या कृत्यामुळे जगभरात चर्चेचा विषय ठरला आहे. ग्राहकाला डिलीवरी करण्यात येणाऱ्या पिझ्झावर थुंकल्याचा आरोप या डिलीवरी बॉयवर (Delivery Boy) आहे. त्याच्या या कृत्याचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेजही समोर आले असून, या कृत्याबद्दल या डिलीवरी बॉयला 18 वर्षांच्या कारावासाची शिक्षा (18 Years Sentence) ठोठावण्यात यावी अशी मागणी जनमानसातून पुढे येऊ लागली आहे. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार ही घटना 2017 मध्ये एस्किसीर येथे घडली. तसेच, इमारतीत असलेल्या सीसीटीव्ही कैद झालेल्या या घटनेचे दृश्य जेव्हा पुढे आले तेव्हा, डिलीवरी बॉयच्या या कृत्याचा भांडाफोड झाला.

या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही व्हायरल झाले आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये डिलीवरी बॉय थुंकताना दिसतो. आरोपीची ओळख बुरक एस अशी झाली आहे. धक्कादायक म्हणजे थुंकण्याचे कृत्य करताना आरोपी स्वत:च्या मोबाईलमध्ये या घटनेचे चित्रीकरण करत असल्याचेही दिसते. दरम्यान, त्याने असे का केले असावे याबाबत अद्याप माहिती पुढे आली नाही. डीएचएने म्हटले आहे की, ग्राहकांच्या आरोग्यास हानी पोहोचवल्याबद्दल तसेच, ग्राहकाचे आरोग्य धोक्यात टाकल्याबद्दल आरोपीवर 600 यूरो इतका दंड आकारण्यात आले आहे. तसेच, 'विषारी अन्न' विषारी अन्न पोहोचविल्याबद्दल त्याला दीर्घ काळाची शिक्षा ठोठावण्यात यावी अशीही मागणी होत आहे. (हेही वाचा, खवय्या लोकांना आस्वादासाठी नवी पर्वणी; 'गुलाबजाम पिझ्झा'ने घातलीये सगळ्यांनाच भुरळ)

दरम्यान, सिक्योरिटी सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर इमारत मालकाने ग्राहकाला तातडीने या प्रकाराची माहिती दिली. ज्यानंतर ग्राहकाने कायदेशीर तक्रार नोंदवली. तुर्कीच्या कायद्यानुसार अधिकाधिक सजान देण्याची मागणी या तक्रारीत करण्यात आली आहे. दरम्यान, या आधीही विविध कंपन्यांच्या डिलीवरी बॉयकडून अशा विचित्र घटना घडल्याच्या बातम्या अनेकदा आल्या आहेत.