Couple Romance in Mumbai Local Video: मुंबई लोकल ट्रेनमध्ये जोडपी एकमेकांच्या अंगचटीला; चाळे पाहून प्रवाशांनी फिरवल्या नजरा, व्हिडिओ व्हायरल
Couple Romance in Mumbai Local Video | (PC - Twitter)

'कामातुराणां भयं न लज्जा' लज्जा याची प्रचिती दाखवणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ मुंबई लोकल ट्रेनमधील (Couple Romance in Mumbai Local Video) असल्याचा दावा केला जात आहे. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. मात्र, गर्दीने खचाखच भरलेल्या ट्रेनमध्ये दोन जोडप्यांच्या अतिउत्साहीपणाने (Couple Kissing in Mumbai Local) अत्युच्च टोक गाठल्याचे व्हिडिओत पाहायला मिळते. हा व्हिडिओ या जोडप्यांसोबतच प्रवास करणाऱ्या कोणातरी एका सहप्रवाशाने काढल्याचे बोलले जात आहे. व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.

व्हिडिओमध्ये पाहायला मिळते की, मुंबई लोकल ट्रेनच्या एका डब्यात प्रवाशांची खचाखच गर्दी आहे. अर्थात गर्दी आणि मुंबई ट्रेन यांचे नाते नवे नाही. आशा गर्दीत दोन जोडपी समोरासमोरच्या आसनांवर बसली आहेत. ती केवळ बसलीच नाही तर ती चांगील रंगातही आली आहेत. एकमेकांच्या बाहूपाशात विसावलेली ही जोडपी एकमेकांची उत्तेजना वाढवत काहीशी अधिकच उत्तेजीत झाली आहेत. प्रेमाच्या (?) नशेत त्यांना भान न राहिल्याने बहुदा ती एमकेकांच्या अधिकच अंगचटीला आलेली पाहायला मिळत आहे. ज्यामुळे सहप्रवाशांचा काहीसा रसभंग झाल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ आपण खाली पाहू शकता. (हेही वाचा, Quick Style Group Performs in Mumbai Local: क्विक स्टाइल ग्रुपचा मुंबई लोकलमध्ये भन्नाट डान्स परफॉर्मन्स (Watch Video))

व्हिडिओ

दरम्यान, इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेप्रमाणे मुंबई लोकल ट्रेनला अनेक आव्हाने आणि समस्यांचा सामना करावा लागतो. त्यापैकी गर्दी ही मुंबई लोकल ट्रेन व्यवस्थेशी संबंधित महत्त्वाची समस्या आहेत. मुंबई लोकल ट्रेनला भेडसावणारे सर्वात महत्त्वाचे आव्हान म्हणजे गर्दी. खास करुन पहाटे सहाते दुपारी 12 आणि सायंकाळी 5 ते रात्री शेवटच्या ट्रेनपर्यंत मुंबई लोकल प्रवासादरम्यान गर्दी पाहायला मिळते. परिणामी प्रवाशांना दाटीवाटीने प्रवास करावा लागतो. जे आरोग्याच्या दृष्टीने अस्वस्थ करणारे आणि धोकादायक देखील असू शकते.