Couple Challenge on Social Media: कपल चॅलेंजवर सिंगल्स कडून भन्नाट मीम्स आणि जोक्स शेअर! (See Post)

काहीजणांना ही चॅलेंजेस स्वीकारुन फोटो पोस्ट करायला आवडते. तर काहीजण त्यावर नाकं मुरडतात. मात्र कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान या चॅलेंजेसनी घरी बसून कंटाळलेल्या युजर्सचे मनोरंजन केले.

Couple Challenge (Photo Credits: Twitter)

सोशल मीडियावर नवनवे चॅलेंजेस येत असतात. काहीजणांना ही चॅलेंजेस स्वीकारुन फोटो पोस्ट करायला आवडते. तर काहीजण त्यावर नाकं मुरडतात. मात्र कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान या चॅलेंजेसनी घरी बसून कंटाळलेल्या युजर्सचे चांगलेच मनोरंजन केले. असे एक चॅलेंज सध्या सोशल मीडियावर ट्रेंड मध्ये आहे. ते म्हणजे #CoupleChallenge. याचा उत्साह सोशल मीडियावर ओसंडून वाहत आहे. कलपने (Couple) एकमेकांसोबतचे फोटो शेअर करायचे आहेत. मन रमवायला हे चॅलेंज मस्त वाटत असले तरी सिंगल (Single) असलेल्यांनी हे चॅलेंज स्वीकारणे शक्य नाही. म्हणून सिंगल युजर्सने भन्नाट मीम्स, जोक्स शेअर करत आपल्या भावना मजेशीर पद्धतीने व्यक्त केल्या आहे. फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्रावर हे #CoupleChallenge चे मीम्स आणि जोक्स (Funny Memes And Jokes) ट्रेंड होत आहेत.

कपल चॅलेंज नेमके कोणी सुरु केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, हे चॅलेंज ट्रेंड व्हायला फारसा वेळ लागला नाही. चॅलेंजला सुरुवात होताच अवघ्या काही वेळात नेटकरी याच्या प्रेमात पडले. त्यानंतर झटपट हे चॅलेंज स्वीकारुन रोमांटिक कपल फोटो शेअर करायला सुरुवात केली. दरम्यान, सिंगल युजर्सने या चॅलेंजमुळे त्यांना नेमके काय वाटले, हे मजेशीर मीम्स शेअर करुन दाखवून दिले.

पहा व्हायरल होणारे मीम्स आणि जोक्स:

तुम्हीही #CoupleChallenge वरील कपल्सचे रोमांटीक फोटो पाहुन कंटाळलात का? तुम्ही सिंगल आहात का? तर तुम्हीही एक मीम्स किंवा जोक्स शेअर करु शकता आणि कपल चॅलेंजमध्ये सहभागी होऊ शकता. तसंच तुमच्या सिंगल मित्र-मैत्रिणींना हे जोक्स पाठवू शकता.