Fact Check: चांद्रयान-2 ने पाठवले पृथ्वीचे फोटोज? जाणून घ्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोंमागील सत्य

पण काय आहे त्यामागील सत्यता? जाणून घ्या...

चांद्रयान-2 ने पाठवले पृथ्वीचे फोटोज? (Photo Credits: Twitter)

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (Indian Space Research Organisation- ISRO) चांद्रयान-2 (Chandrayaan-2) चे 22 जुलै रोजी यशस्वीरित्या प्रेक्षपण केले. तर काहीज दिवसांपूर्वी चांद्रयानाने पृथ्वीची एक कक्षा पर करत दुसऱ्या कक्षेत प्रवेश केल्याची माहिती इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी दिली. सध्या चांद्रयान-2 ने पाठवलेले फोटोज म्हणून सोशल मीडियावर काही फोटोज व्हायरल होत आहेत. हे फोटोज पृथ्वीचे असून चांद्रयान-2 ने पाठवलेले आहेत, असा दावा केला जात आहे. (Chandrayaan-2: पृथ्वीची पहिली कक्षा यशस्वीरीत्या ओलांडत 'बाहुबली'ची पुढे वाटचाल; ISRO ने ट्विट करत दिली माहिती)

असा एक फोटो नसून 6-7 फोटोज शेअर करण्यात आले आहेत. तसंच हे फोटो शेअर करत चांद्रयान-2 ने काढलेले पृथ्वीचे फोटोज. किती मोहक दृश्य आहे, असं कॅप्शन देत हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत. (चांद्रयान-2 अवकाशात झेपावले, 'ISRO'च्या ऐतिहासिक कामगिरीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कौतुक)

व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारे फोटोज:

पृथ्वीभोवती होत असलेल्या बदलावा दरम्यानचा हा फोटो आहे.

 

ज्वालामुखीच्या स्तराचा हा फोटो आहे, असे या फोटोबाबत सांगण्यात आले आहे.

 

यात चंद्र, सुर्य, पृथ्वी दिसत आहे.

 

पृथ्वीच्या कोण्या एका जागेवरुन ज्वालामुखीचा उद्रेक होत असतानाचा फोटो.

 

चंद्र चमकत असतानाचा फोटो.

 

हा रात्री घेतलेला पृथ्वीचा फोटो असल्याचे सांगण्यात येत आहे.

 

काय आहे सत्य?

आतापर्यंत चांद्रयान-2 ने कोणत्याही प्रकारचे फोटोज पाठलेले नाहीत. हे जे फोटोज सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांचा चांद्रयान-2 शी काहीही संबंध नाही. चांद्रयान-2 च्या नावाने व्हायरल होणारे हे फोटोज काही जुने आहेत. तर त्यातील काही फेक देखील आहेत.