Car Vandalism In Pimpri Chinchwad: गाड्यांची तोडफोड करताना बनवली रील , पिंपरी-चिंचवड येथील घटना, पाहा व्हिडीओ

ज्यामध्ये एक मुलगा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडत आहे आणि दुसरा मुलगा मोबाईलने त्याचा व्हिडिओ बनवत आहे. या घटनेनंतर गुन्हेगार किती बेधडक आहेत आणि त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे या घटनेतुन दिसून येते. थेरगाव संकुलात मध्यरात्री ही घटना घडली.

Car Vandalism In Pimpri Chinchwad

Car Vandalism In Pimpri Chinchwad: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवडचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक मुलगा रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या काचा फोडत आहे आणि दुसरा मुलगा मोबाईलने त्याचा व्हिडिओ बनवत आहे. या घटनेनंतर गुन्हेगार किती बेधडक आहेत आणि त्यांना पोलिसांचा धाक राहिलेला नाही, हे या घटनेतुन दिसून येते. थेरगाव संकुलात मध्यरात्री ही घटना घडली. या संपूर्ण घटनेचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेऱ्यात कैद झाले आहे. या घटनेत सहभागी तिन्ही मुले अल्पवयीन असल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री तीन अल्पवयीन मुलांनी थेरगाव येथील एकता कॉलनी येथे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. यामध्ये एक मुलगा बेधडकपणे गाडीची काच फोडत होता, तर दुसरा त्याच्या मोबाईलने त्याची रील काढत होता. या अल्पवयीन आरोपींनी पाच ते सहा वाहनांची तोडफोड केली आहे.

पाहा पोस्ट:

Five to six vehicles were vandalized by miscreants using sickles while making reels in #wakad #Pune#vehicle #vandalism #reel #vehiclevandalism #reelmaking #wakadpolicestation #pimprichinchwad pic.twitter.com/gg1dgHBdTT

— Pune Pulse (@pulse_pune) June 24, 2024

या घटनेत दोन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एक अल्पवयीन फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या आरोपींच्या मनात पोलिसांची किती भीती आहे हे समजते.