Odisha मध्ये 2 डोकं आणि 3 डोळे असलेल्या वासराला गाईने जन्म दिल्याची दुर्मिळ घटना; गावकर्यांकडून मां दुर्गाचं रूप मानून पूजा (Watch Viral Video)
त्याने ती दोन वर्षांपूर्वी खरेदी केली होती. सध्या सोशल मीडीयात या गाईचा आणि तिच्या वासराचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
Calf Born with 2 heads and 3 Eyes: ओडिशा (Odisha) च्या नबरंगपुर (Nabrangpur) मध्ये एका गाईने दोन डोकं आणि तीन डोळे असलेल्या एका वासराला जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. या वासराचा जन्म नवरात्रीच्या दिवसात झाल्याने स्थानिकांनी तिची पूजा करण्यास सुरूवात केली आहे. अनेकांना ती मां दुर्गाचं रूप वाटत आहे. कुमुली पंचायत च्या बीजापुर गावातील शेतकरी धनीराम (Dhaniram)याची ही गाय आहे. त्याने ती दोन वर्षांपूर्वी खरेदी केली होती. सध्या सोशल मीडीयात या गाईचा आणि तिच्या वासराचा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
दोन तोंडाचं वासरू पाहून तिच्या मालकाचं कुटुंब देखील चकित झालं आहे. इंडिया टुडेच्या माहितीनुसार, 2 वर्षांपूर्वी घेतलेली ही गाय नुकतीच गर्भवती राहिली होती. प्रसव वेदना सुरू झाल्या तेव्हा वासराच्या जन्माच्या वेळेस अडचणी यायला लागल्या. नंतर धनिराम ने पाहिलं तेव्हा वासराला चक्क 2 तोंड आणि 3 डोळे असल्याचं दिसलं. नक्की वाचा: Rare Two-Headed Baby Shark: पालघरमधील मच्छीमाराने पकडले 2 तोंडे असलेल्या दुर्मिळ शार्क माश्याचे पिल्लू; महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील पहिलीचं घटना, पहा खास फोटोज.
पहा व्हिडिओ
गावात जेव्हा या वासराची चर्चा झाली तेव्हा त्यांनी हे दुर्गेचं रूप असल्याची भावना निर्माण झाली आणि त्यांनी वासराला पुजायला सुरूवात केली. गोमातेकडून दूध प्यायला वासराला त्रास होत असल्याने शेतकर्याला या वासराला बाहेरून दूध द्यावं लागत आहे. दोन तोंडामुळे ते स्वतः दूध पिऊ शकत नाही.