No Shower, Only Sex! लॉकडाउन काळात पती आंघोळही न करता सतत सेक्स करतो म्हणून महिलेने मागितली पोलिसांकडे मदत

आपला पती लॉक डाऊन मुळे घरी असताना आंघोळ न करता सतत सेक्स (Sex) ची मागणी करत असतो आणि जर का सेक्ससाठी नाही म्हंटले तर तो आपल्यावर जबरदस्ती करत मारहाण करतो अशी तक्रार एका महिलेने पोलिसां कडे केली आहे

Husband refuses to have bath, demands sex (Photo Credits: File Image)

बंगळुरू: लॉकडाऊन (Lockdown) काळात घरात अडकून पडलेल्या कपल्सना एकमेकांसोबत वेळ घालवण्याची नामी संधी आहे. मात्र काही कपल्सच्या बाबत हा लॉकडाऊन चा सहवास डोक्याला ताप झाला आहे. अशी काही प्रकरणे साधारण परदेशातून तर रोजच ऐकू येऊ लागलीयेत मात्र आता बंगळुरू (Bengaluru) मध्ये सुद्धा एका महिलेने आपल्या पतीला वैतागल्याची तक्रार करत पोलिसांकडे मदत मागितली आहे. या महिलेची तक्रार ही नेहमीपेक्षा बरीच हटके आहे, आपला पती लॉक डाऊन मुळे घरी असताना आंघोळ न करता सतत सेक्स (Sex) ची मागणी करत असतो आणि जर का सेक्ससाठी नाही म्हंटले तर तो आपल्यावर जबरदस्ती करत मारहाण करतो असे या महिलेने पोलिसांना सांगितले आहे. धक्कादायक! Lockdown मुळे पतीसोबत वारंवार Sex करुन दमलेल्या घाना शहरातील महिलेने सरकारकडे मांडली आपली व्यथा; केली ही 'विचित्र' मागणी, Watch Video

TOI च्या वृत्तानुसार, बंगळुरू मधील जयनगर येथील एका 31 वर्षीय महिलेने आपल्या नवऱ्याबद्दल ही तक्रार करण्यासाठी पोलिसांच्या परिहार या हेल्पलाईन वर कॉल केला होता. 24 मार्च रोजी लॉकडाउन सुरु झाल्यापासून, पतीने आंघोळ करणे थांबवले आहे आणि तसाच तो आपल्यावर सेक्स करण्याचा दबाव टाकत आहे. कामाची परवानगी असताना सुद्धा तो त्याचे व्यापाराचे दुकान सुरु करत नाहीये, वारंवार स्वच्छतेची आठवण करून दिली तरी ऐकत नाहीये असे सांगताना महिलेने अगतिक होऊन पोलिसांकडे मदत मागितली. या महिलेला मदत करताना पोलिसांनी तिच्या पतीशी संवाद साधत त्याला स्वच्छतेची गरज सांगितली. तसेच महिलेला मारहाण करण्याच्या बाबत सुद्धा समज दिली.

दरम्यान अशा प्रकारचा हा काही पहिलाच प्रसंग नाही, या पूर्वी घाणा देशातील एका महिलेने सुद्धा लॉक डाऊन संपवा नाहीतर पतीला कामावर बोलावून घ्या अशी विनंती करणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. घरी असल्याने दिवसरात्र सेक्सची मागणी करणाऱ्या पतीला आपण वैतागलो आहोत असेही या महिलेने व्हिडीओ मध्ये म्हंटले होते.मागील काही काळात लॉक डाऊन मुळे भारतसह जगभरात घरगुती हिंसाचाराच्या घटना वाढत आहेत यावर आळा घालण्यासाठी राज्यांकडून हेल्पलाईन नंबर सुरु करण्यात आले आहेत.