Viral: रस्त्यावरून जाताना लष्करी जवानाने इलेक्ट्रिक स्कूटर चालकाला लगावली थपड्ड, पहा व्हायरल व्हिडिओ
तरी देखील काही जण हे नियम तोडताना दिसतात. असाच एक वाहतूक चालक नियम तोडत असतानाचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. नियम तोडल्याने नंतर त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या एका लष्करी दलातील सुरक्षा रक्षकाने थपड्ड लगावली.
Viral: रस्त्यावरून वाहतूक चालवताना सर्वांना समान नियम बनवले आहेत. तरी देखील काही जण हे नियम तोडताना दिसतात. असाच एक वाहतूक चालक नियम तोडत असतानाचा व्हिडिओ सद्या व्हायरल होत आहे. नियम तोडल्याने नंतर त्याला रस्त्यावरून जाणाऱ्या एका लष्करी दलातील सुरक्षा रक्षकाने थपड्ड लगावली. (हेही वाचा- बसस्थानक आहे की तलाव, पुण्याच्या स्वारगेट बसस्थानकाची दुरवस्था, व्हिडिओ व्हायरल
व्हिडिओत दिसल्याप्रमाणे, इलेक्ट्रिक स्कूटर चालवणारा एक व्यक्ती विरुध्द दिशेने रस्त्यावरून जात होता. त्याच वेळीस समोरून येणाऱ्या कारने वेळीस ब्रेक मारला आणि कार थांबवली. कार चालक आणि इलेक्ट्रानिक स्कूटर चालक यांच्यामध्ये काही वेळ बाचाबाची झाली. ही घटना मागून येणाऱ्या लष्करी ट्रकच्या चालकाने पाहिली. हे पाहून त्यांनी संताप व्यक्त केला. ट्रकमधून उतरून त्याने स्कूटर चालकाला एक थप्पड लगावली. सुरक्षा रक्षाकाने दुचाकी स्वाराला समाजावून सांगितले. तेवढ्यात महिला ट्रॉफिक पोलिस घटनास्थळी आली.
व्हायरल व्हिडिओ
ही घटना नेमके कुठे घडली हे अद्याप समोर आले नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ही घटना कारच्या डॅश कॅमने कैद केली. कार चालक योग्य दिशेने जात होता. परंतु दुचाकी विरुद्ध दिशेने येत होते. वेळीच सावध झाल्याने अपघात टळला नाही तर मोठा घात घडला असता. वाहतुकीचे नियम मोडल्याने दुचाकी स्वारावर दंड आकारण्यात आले आहे.