World Record बनविण्यासाठी हवेतील Helicopter ला लटकत तरुणाकडून Pull-Ups; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिोत एक पठ्ठ्या चक्क हवेत उडत्या हेलिकॉप्टरला (Helicopter) लटकून स्टंट करताना दिसत आहे. अवघ्या काही सेंकंदाचाच असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.

Pull-up With a Helicopter | (Photo Credits: Instagram)

व्हायरल (Viral Video) होण्यासाठी कोण काय करेल सांगता येत नाही. सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिोत एक पठ्ठ्या चक्क हवेत उडत्या हेलिकॉप्टरला (Helicopter) लटकून स्टंट करताना दिसत आहे. अवघ्या काही सेंकंदाचाच असलेला हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओत पाहायला मिळते की हा तरुण हेलीकॉप्टरच्या लँडीग स्लाईडला पकडून पुलअप्स (Pull-ups) काढतो आहे.

व्हिडिओत पाहायला मिळते की एक हेलिकॉप्टर हवेत अडाले. त्यानंतर काहीच सेकंदात एक युवक हेलीकॉप्टरच्या लँडीग स्लाईडला पकडून पुलअप्स काढतो आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओसोबत लिहिले आहे की, एका मिनीटात अधिकाधिक पुलप्स तेही हेलिकॉप्टरला पकडून. (हेही वाचा, Shocking! आईने मुलाला साडीने बांधून दहाव्या मजल्यावरून खाली सोडले; समोर आले धक्कादायक कारण (Viral Video))

 

View this post on Instagram

 

A post shared by Guinness World Records (@guinnessworldrecords)

रोमन सहराडियन द्वारा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शेअर केल्यापासून आतापर्यंत या व्हिडिओने 95 हजारांपेक्षाही अधिक लाईक्स घेतल्या आहेत. लोक व्हडिओवर प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने म्हटले आहे की, खरेतर खरा विक्रम हेलिकॉप्टर पायलटचा आहे. कारण तरुणाने लटकूनही त्याने हेलिकॉप्टर क्रॅश होऊ दिले नाही. गिनीज वर्ल्ड रिकॉर्डने दिलेल्या माहितीनुसार, रोमन याने हे रेकॉर्ड पाठिमागील वर्षी 2 ऑक्टोबरला आर्मेनिया येथील येरेवन येथे केले. तो अनेक वेळा रेकॉर्ड होल्डरही राहिला आहे.