Anand Mahindra: आनंद महेंद्रांची भन्नाट कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना आवडणार का? व्हिडीओ बघून तुम्हीही व्हाल थक्क

नव्या कल्पना , संकल्पना आनंद महेंद्रा नेहमीचं त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर करताना दिसतात.

महेंद्रा ग्रुपचे (Mahindra Group) प्रमुख असलेले आनंद महेंद्रा (Anand Mahindra) नेहमी नाविन्य (Innovation), सृजनत्व या बाबींना वाव देताना दिसतात. काही नव्या कल्पना (Idea), संकल्पना आनंद महेंद्रा नेहमीचं त्यांच्या सोशल मिडीयावर शेअर (Social Media) करताना दिसतात. यातून ते तरुणाच्या कलागुणांना संकल्पनांना वाव देतात. तसेच स्वतही खासगी पातळीवर त्याची दखल घेतात. नाविन्य पूर्ण असाच एक व्हिडीओ (Video) महेंद्रांनी त्यांच्या अधिकृत अकाउंटवर (Tweeter Account) शेअर (Share) केला आहे. ज्यात त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना (Nitin Gadkari) टॅग (Tag) करत एक भन्नाट कल्पना सुचवली आहे. आता ही कल्पना नितीन गडकरींना आवडणार का या बाबत नेटकऱ्यांची सोशल मिडीयावर (Social Media) मोठी चर्चा रंगली आहे. कारण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील कायमचं नाविन्यपूर्ण गोष्टींवर काम करताना दिसतात तर महेंद्राच्या या कल्पनेवर गडकरींना आवडेल का अशी चर्चा रंगली आहे.

 

आनंद महेंद्रांनी (Anand Mahindra) शेअर (Share) केलेल्या या व्हिडीओत (Video) एक बोगदा दिसतो. पण व्हिडीओत दिसणारा हा बोगदा (Tunnel) विशेष आहे कारण हा कॉंक्रेटचा (Concrete) बोगदा नसुन रस्त्याच्या दोन्ही बाजू असणाऱ्या झाडांचा बोगदा आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूना दाटीवाटीने झाडे आहेत,ज्यामुळे रस्त्याहून प्रवास करताना जणू काही बोगद्यातून (Tunnel) प्रवास करत असल्याचा भास होत आहे. या व्हिडीओस (Video) महेंद्रांनी (Anand Mahindra) कॅप्शन (Caption) दिले आहे, मला बोगदे आवडतात, पण खरे सांगायचे तर मला कॉंक्रेटच्या बोगद्यापेक्षआ (Concrete Tunnel)  झाडांच्या बोगद्यातून जायला अधिक आवडेल. तसेच या व्हिडीओच्या (Video) कॅप्शन (Caption) मध्येच नितीन गडकरींना (Nitin Gadkari)  महेंद्रांनी (Anand Mahindera) विचारलं आहे, तुम्ही नव्याने बांधत असलेल्या ग्रामीण रस्त्यांवर याप्रमाणे आपल्याला झाडांचे बोगदे तयार करता येणार नाही का? (हे ही वाचा:- Mukesh Ambani Buys Villa in Dubai: मुकेश अंबानी यांनी दुबईत खरेदी केले आलिशान घर; किंमत ऐकून उडेल तुमची झोप)

हा व्हिडीओतील (Video) दृश्य अगदी मनमोहक आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या (Nitin Gadkari) नेतृत्वात देशाच्या कानाकोपऱ्यात रस्तेबांधणीचं काम सुरु आहे. एव्हडचं नाही तर नवनवीन संकल्पनेसह ते हे बांधकाम पूर्ण करतात. तरी भारतच्या कुठल्या रस्त्यांवर आता या प्रकारच्या ट्री टनेल बघायला मिळतील याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.