10 Year Challenge मध्ये अमृता खानविलकर, अमेय वाघ, अभिजीत खांडकेकर सह मराठी सेलिब्रिटी आणि सामान्यांची उडी, 10 वर्षांचा फ्लॅशबॅक अवघ्या दोन फोटोंमध्ये
या चॅलेंजमध्ये सामान्य व्यक्तींपासून अगदी सेलिब्रिटींनीही सहभाग घेतला आहे.
10 Year Challenge: सोशल मीडियावर नेहमीच नवनव्या चॅलेंजेसची चर्चा रंगत असते. अगदी एका आजारासाठी 'आईस बकेट चॅलेंज'(Ice Bucket Challenge) सुरू करण्यात आलं होतं. तर अगदी काही दिवसांपूर्वीपर्यंत भयानक 'कीकी' चॅलेंज (KIKI Challenge) धूमाकुळ घालत होतं. मात्र 2019 हे नवं वर्ष सुरू झाल्यानंतर आता नव्या चॅलेंजची चर्चा सुरू व्हायलाच हवी. 2019 चे पंधरा दिवस उलटत नाहीत तर जगात सध्या 10YearChallenge सुरू झालं आहे. या चॅलेंजमध्ये सामान्य व्यक्तींपासून अगदी सेलिब्रिटींनीही (Marathi Celebrities) सहभाग घेतला आहे.
काय आहे 10 Year Challenge?
10YearChallenge माध्यमातून 2019 आणि 2009 या दोन वर्षांतील फोटो कोलाजच्या माध्यामातून सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले जात आहे. वर्ष पटापट सरतात आणि आपल्या नकळतच आपल्यामध्ये किती बदल झालाय हे या थ्रो बॅक फोटोंमधून पाहता येतयं.
बॉलिवूड कलाकारांसमवेत अनेक मराठी कलाकारांनी या चॅलेंजमध्ये उडी घेत दहा वर्षातील त्यांच्यामधील बदल सोशल मिडीयावर शेअर केला आहे. मग पहा कोणकोणत्या मराठी कलाकारांनी शेअर केले त्यांचे खास फोटो
अमेय वाघ
अमृता खानविलकर
'नटरंग' सिनेमातील 'वाजले की बारा' ही लावणी अमृता खानविलकरसाठी तिच्या करियरमधील एक टर्निंग पॉईंट आहे. नटरंगपासून 2018 सालच्या '...आणि डॉ. काशिनाथ घाणेकर' या सिनेमातील 'तुम्हावर मर्जी' या लावणींमधील लूक अमृताने शेअर केले आहेत.
क्रांती रेडकर
क्रांती रेडकरसाठी सध्याच्या काळ तिच्या आयुष्यातील सुंदर टप्प्यातील आहे. नुकताच क्रांतीने जुळ्या मुलींना जन्म दिला आहे.
View this post on Instagram
#10yearchallenge #evolvedmakeup
A post shared by Kranti Redkar Wankhede (@kranti_redkar) on
अभिजीत खांडकेकर
View this post on Instagram
झाली की १० वर्ष #10yearchallenge #abhijeetkhandkekar #challenge #thenandnow
A post shared by Abhijeet Khandkekar (@abhijeetkhandkekar) on
आरती वडगबाळकर
निलेश मोहरीर
आर्या आंबेकर
पंचरत्नांपैकी एक चिमुकली 'आर्या आंबेकर' आता गायिका, अभिनेत्री आर्या झाली आहे.
नेहा राजपाल
View this post on Instagram
#instagram #10yearchallenge #2009 v/s #2019
A post shared by NehaRajpal (@neharajpalmusic) on
अजून कोणकोण सेलिब्रिटी त्यांच्या आयुष्यातील मागील दहा वर्षांचा काळ आपल्यासमोर फोटोंच्या माध्यमातून ठेवणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. पण तुम्ही या चॅंलेजमध्ये सहभागी होऊन फोटो शेअर केला आहे का?