Hit And Run Case In Karnataka: कर्नाटकच्या बिदरमध्ये रस्ता ओलांडताना भरधाव कारची विद्यार्थ्याला धडक; व्हिडिओ पाहून येईल अंगावर शहारा (Watch Video)

या भीषण घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये, कारने मुलाला धडक दिल्याचा नेमका क्षण कैद करण्यात आला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, हा विद्यार्थी काही फूट उंच हवेत फेकला गेला.

Hit And Run Case In Karnataka (फोटो सौजन्य - X/@HateDetectors)

Hit And Run Case In Karnataka: मंगळवारी सकाळी कर्नाटकातील बिदर जिल्ह्यात (Bidar District) हिट अँड रन (Hit And Run Case) ची घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील जिरगा क्रॉसजवळ रस्ता ओलांडताना वेगवान कारने धडक दिल्याने एक विद्यार्थी गंभीर जखमी झाला. विकास सोपान असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. या भीषण घटनेचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला आहे. व्हिडीओमध्ये, कारने मुलाला धडक दिल्याचा नेमका क्षण कैद करण्यात आला आहे. ही धडक इतकी भीषण होती की, हा विद्यार्थी काही फूट उंच हवेत फेकला गेला.

वृत्तानुसार, कारचा चालक जखमी मुलाला मदत करण्यासाठी न थांबता घटनास्थळावरून पळून गेला. मात्र, नंतर पोलिसांनी संशयिताला पकडले. त्यानंतर पोलिसांनी हिट अँड रन प्रकरणी वाहन जप्त केले. विकासची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (हेही वाचा -Delhi Hit and Run Case: दिल्ली मध्ये मर्सिडीज कारच्या धडकेत 34 वर्षीय सायकलस्वाराचा मृत्यू)

येथे पहा व्हिडिओ -

हिट अँड रनच्या या घटनेनंतर रहिवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. परिसरातील लोकांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत रस्ता रोको आंदोलन केले. तहसीलदारांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांनी विकासच्या कुटुंबीयांना तातडीने नुकसान भरपाई आणि परिसरातील रस्ता सुरक्षा सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान, संतापुरा पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.