Swapnil Joshi Birthday Special : 'या' भूमिका ठरल्या लक्षवेधी !

िनेमा, मालिका, कॉमेडी शो, नाटक अशा विविध माध्यमातून त्याने अनेक भूमिका साकारल्या. पण त्याच्या या भूमिका लक्षवेधी ठरल्या.

मराठी सिनेसृष्टीचा चॉकलेट बॉय स्वप्निल जोशी याचा आज वाढदिवस. स्वप्निलचा स्मार्ट लूक, दमदार अभिनय आणि रोमांटिक अंदाज लोकप्रिय आहे. गेली 30-32 वर्ष आपल्या अभिनयाने त्याने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केले आहे. सिनेमा, मालिका, कॉमेडी शो, नाटक अशा विविध माध्यमातून त्याने अनेक भूमिका साकारल्या. पण त्याच्या 'या' भूमिका लक्षवेधी ठरल्या. (Photo Credit : Instagram)

श्रीकृष्ण- स्वप्निलने साकारलेला श्रीकृष्ण अजूनही प्रत्येकाच्या मनात कायम आहे. गोड, निरागस चेहरा आणि तितकाच अप्रतिम अभिनय लक्षवेधी ठरला.
(Photo Credit : Instagram)
घनःश्याम- 'एका लग्नाची दुसरी गोष्ट' या मालिकेतील घना प्रेक्षकांना भावला. या भूमिकेवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केले. (Photo Credit : Instagram)
गौतम- 'मुंबई पुणे मुंबई'मधील अवखळ, अल्लड पण तितकाच समजूतदार, प्रेमळ, रोमांटिक गौतम रसिकांना भिडला नसेल तर नवलचं. (Photo Credit : Instagram)
श्रेयस- 'दुनियादारी' सिनेमातील चॉकलेट बॉय श्रेयसची तरुणाईला भूरळ पडली. (Photo Credit : Instagram)
श्लोक- 'रणांगण' सिनेमात स्वप्निलचा एक अनोखा लूक पाहायला मिळाला. यात स्वप्निलने पहिल्यांदाच निगेटीव्ह भूमिका साकारली होती. पण त्याच्या दमदार अभिनयामुळे या श्लोकची व्यक्तिरेखा उठावदार झाली. (Photo Credit : Instagram)
Share Now
Advertisement

Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement