Zomato Boy Celebrate Birthday: झोमॅटोसाठी काम करणाऱ्या तरुणाने असा साजरा केला वाढदिव; झौमॅटोने दिलं रिटर्न गिफ्ट
त्यामुळे झोमॅटो कंपनीने खुश होवून त्याला केक पाठवला.
Zomato Boy Celebrate Birthday: बहुतेकजण आपला वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करत असतो. वाढदिवस कायम लक्ष्यात राहण्यासाठी काही तरी वेगवेगळं करत असतात. तसच झोमॅटोसाठी (Zomato) काम करणाऱ्या मुलाने केलं आहे. त्याने त्याच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक ऑर्डरवर त्यांने चॉकलेट दिलं. हे पोस्ट त्याने इन्स्टाग्रामच्या अंकाउटवरून शेअर केलं आहे. नेटकऱ्यांनी ह्या पोस्टवर चांगलेच प्रतिसाद दिला. झोमॅटोबॉयचा हा वाढदिवस सर्वांच्याच लक्ष्यात राहील.
सोशल मीडियवर त्याच्या ह्या कामाची चांगलीच चर्चा होतेय. करण जयराज आपटे असे त्या मुलाचे नाव आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या अकांउटवरून पोस्ट शेअर करत म्हणाला, आज माझा वाढदिवस आहे, त्यामुळे मी प्रत्येक ऑर्डरवर चॉकलेट पाठवत आहे. त्याचसोबत त्याने #Zomato वापरत पोस्ट शेअर केलं त्याला अनेक नेटकऱ्यांनी वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा दिल्या.
त्याची पोस्ट व्हायरल झाल्यामुळे झोमॅटोने त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याला केक पाठवला. त्याने त्या केकचा फोटो आणि धन्यवादची पोस्ट पुन्हा सोशल मीडियावर शेअर केली आहे. कॅटबेरीने देखील त्याला चॉकलेटने भरलेला बॉक्स पाठवला. 21 जून पासून ही पोस्ट व्हायरल होत आहे. 3800 अधिक लोकांनी ह्या पोस्टला पसंती दिली आहे. अनेक युजर्सने कंमेट देखील केल्या आहेत.