Suicide: लग्नाला मुलगी मिळत नाही म्हणून जळगावमधील तरुणाची आत्महत्या
कोरोनाच्या काळात दोन वर्षांपासून लग्न सोहळे लांबणीवर पडले होते. पण, आता कोरोनाची लाट गेल्यामुळे सर्वत्र लग्नाची (Married) लगबग सुरू आहे. मात्र, जळगावमध्ये (Jalgaon) वयाची तिशी ओलांडत चालली आहे पण मुलगी मिळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे.
कोरोनाच्या काळात दोन वर्षांपासून लग्न सोहळे लांबणीवर पडले होते. पण, आता कोरोनाची लाट गेल्यामुळे सर्वत्र लग्नाची (Married) लगबग सुरू आहे. मात्र, जळगावमध्ये (Jalgaon) वयाची तिशी ओलांडत चालली आहे पण मुलगी मिळत नसल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याचे समोर आले आहे. जळगाव तालुक्यातील नशिराबाद गावात ही घटना घडली आहे. तरुण चेतन खरोटे असं या तरुणाचं नाव आहे. चेतन खरोटे हा गेल्या काही दिवसांपासून लग्न होत नसल्याच्या कारणाने चिंतेत होता. अनेक वेळा त्याने त्याच्या मित्राजवळ ही खंत देखील व्यक्त केली होती. यामुळे तो व्यसनाच्या ही आहारी गेला होता. अखेर चेतनने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी मन हेलावणारा आक्रोश केला.
गेल्या तीन ते चार दिवसांपूर्वी चेतन खरोटे हा त्याच्या आईला वारंवार लग्न होत नसल्याचा तगादा लावीत होता. याच विवंचनेत असलेला चेतन गेल्या तीन दिवसांपासून व्यसनाच्या ही जास्त आहारी गेला होता. यामुळे चेतनची आई देखील गेल्या दोन-तीन दिवसांपासून आपल्या नातेवाईकांकडे निघून गेली होती. ही संधी साधत चेतनने घर आतून बंद करून घेतले आणि घराच्या छतावरील कडी-कोयंड्याला दोरी बांधून आपली जीवन यात्रा संपवली. हेही वाचा Crime: आईवर होणाऱ्या रोजच्या अत्याचाराला कंटाळून जन्मदात्या पित्याची हत्या, मुलगा अटकेत
बराच वेळ झाला तरी घरातून कुणी बाहेर येत नसल्यामुळे शेजाऱ्यांना संशय बळावला. त्यांनी त्यांच्या आईला माहिती दिली. तेव्हा घराचे दार तोडून आत प्रवेश केला असता चेतनने आत्महत्या केल्याचे आढळून आले. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आणि चेतनचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला. लग्न होत नसल्यामुळे चेतनने पाऊल उचलल्यामुळे कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. त्याच्या मृत्यूबद्दल गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत नशिराबाद पोलीस स्थानकात आज सकाळी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
(The above story first appeared on LatestLY on Mar 25, 2022 12:59 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

