Airbus Beluga At Mumbai: जगातील सर्वात मोठं विमान मुंबईत दाखल! एअरबस बेलुगा विमानाचं मुंबई विमानतळावर लॅंडिंग

हे विमान बघण्यासाठी आज मुंबई विमानतळावर अनेकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे.

जगातील सर्वात मोठ्या विमानांपैकी एक असलेले एअरबस बेलूगा (Airbus Beluga) विमानाचं आगमन काल मुंबई विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport Mumbai) झालं आहे. हे विमान बघण्यासाठी आज मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) अनेकांची गर्दी झाल्याचं बघायला मिळत आहे. एअरबस बेलुगा हे ब्रिझिलीयन विमान (Brazilian Jet) निर्मात्याचे ई२ फॅमिलीतील (E2 Family) सर्वात मोठे जेट आहे. मुंबईत हे जाऐंट विमान पहिल्यांदाच दाखल झालं आहे.  मोठ्या भव्य दिव्य सामानाच्या आयात (Import) निर्यातीसाठी (Export) या विमानाचा वापर केला जातो. तरी प्रवासासाठी दाखाल झालेले प्रवासी हे भव्य दिव्य विमान बघून थक्क होत आहेत.  अंतराळ(Aerospace), ऊर्जा (energy), लष्करी (Defence), वैमानिक, सागरी आणि मानवतावादी क्षेत्रांसह विविध क्षेत्रांसाठी मालवाहू वाहतूकीसाठी एअरबस बैलुगा विमाचा वापर करण्यात येतो.

 

एअरबस बेलुगास (Airbus Beluga) हे विमान जवळपास वीस वर्षांपासून औद्योगिक एअरलिफ्ट गरजांसाठी कार्यरत आहेत. या भव्य दिव्य विमानाची लांबी 56.15 मीटर असुन उंची 17.25 मीटर आहे. तर विंग स्पॅन 44.24 मीटर आहे. बेलुगा एसटीची अर्ध-स्वयंचलित मुख्य डेक कार्गो लोडिंग सिस्टम पेलोड्सची सहजपणे शक्य होते. तरी हे जायंट विमान मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईकरांनी आनंद व्यक्त केला आहे. (हे ही वाचा:- Birth of three Penguins: मुंबईतील राणीच्या बागेत तीन पेंग्विनचा जन्म, मुंबईकरांची बेबी पेंग्विन बघण्यासाठी गर्दी; पहा व्हिडीओ)

 

मुंबईकरांना (Mumbai) देखील हे विमान बघायचं असल्यास विमानळ प्रशासनाची परवानगी घेत हे भव्यदिव्य जायंट विमान (Giant Plane) बघण्याची संधी मिळू शकते. यानंतर एअरबस बेलूगा पुन्हा भारतात कधी येईल माहिती नाही त्यामुळे आता थेट मुंबईत दाखल झालेल्या हे विमान बघत डेळ्याचं पारण फेडण्याची ही उत्तम संधी आहे.