Mumbai Murder: चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू

केईएम रुग्णालयातच तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज संध्याकाळी सातच्या सुमारास उपचारादरम्यान या महिलेने अखेरचा श्वास घेतला आहे.

प्रतिकात्मक फोटो | Image only representative purpose (Photo credit: File)

मुबईच्या (Mumbai) केईएम रुग्णालय (KEM Hospital) परिसरात एका तरूणाकडून करण्यात आलेल्या चाकू हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. केईएम रुग्णालयातच तिच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज  संध्याकाळी सातच्या सुमारास  उपचारादरम्यान या महिलेने अखेरचा श्वास घेतला आहे. याप्रकरणी संबंधित तरूणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केली आहे. यानंतर संपूर्ण परिसरातून संतापजनक प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. तसेच या प्रकरणातील दोषीला कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी मृताचे नातेवाईक करत आहेत.

राजेश काळे (वय, 37) असे आरोपीचे नाव आहे. तर, पीडित महिला सरकारी रुग्णालयात कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेत प्रेमसंबंध होते. परंतु, पीडिताने काही दिवसांपूर्वी आरोपीसोबत असलेले प्रेमसंबंध तोडून टाकले. याच मुद्द्यावरून आरोपी आणि पीडितामध्ये रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास बाचाबाची झाली. त्यावेळी संतापलेल्या आरोपीने पीडित महिलेला काही कळायच्याआधीच त्याच्याजवळ असलेला चाकू काढून तिच्या पोटावर वार केले. या हल्ल्यात पीडित गंभीर जखमी झाली असून आरोपीच्याही पायाला दुखापत झाल्याचे कळत आहे. या दोघांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, आज संध्याकाळी सातच्या सुमारास पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. यासंदर्भात इंडिया टूडेने माहिती दिली आहे. हे देखील वाचा- Maharashtra Shocker: नागपूर मध्ये टीव्ही पाहण्यावरुन आईचा चढला पारा, 15 वर्षीय मुलीने गळफास लावून संपवले आयुष्य

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणातील आरोपी राजेश काळे याच्याविरोधात खुनाचा प्रयत्न केल्याबद्दल कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतील पीडित महिला गोवंडीची रहिवासी आहे. तर, आरोपी मुंबईतील कुर्ला येथे राहायला आहे. या घटनेनंतर पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.