Woman Harassed In INDIGO Flight: इंडीगो फ्लाईटमध्ये महिलेचा लैंगिक छळ, मुंबई-गुवाहाटी विमान प्रवासादरम्यान विनयभंगाच्या घटनेची पुनरावृत्ती
पीडितेने कथित लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर गुवाहाटी येथे विमान उतरल्यानंतर आरोपीला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
Woman Harassed In INDIGO Flight: विमान प्रवासात महिलांच्या विनयभंगाच्या घटना थांबायचं नाव घेत नाहीत. आता मुंबईहून गुवाहाटीला जाणाऱ्या इंडिगोच्या विमानात (Mumbai-Guwahati Flight) एका महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 10 सप्टेंबर रोजी फ्लाइट क्रमांक 6E 5319 मध्ये घडली. पीडितेने कथित लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केल्यानंतर गुवाहाटी येथे विमान उतरल्यानंतर आरोपीला आसाम पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अधिकाऱ्याने सांगितले की, तक्रारदाराने स्थानिक पोलिसांकडे एफआयआर दाखल केला आहे. त्या आधारावर आरोपीवर कारवाई करण्यात आली आहे. इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही तपासात आवश्यक तेथे मदत करू. तक्रार मिळताच आम्ही तातडीने कारवाई केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा -Smoking Inside Dubai-Mumbai Indigo Flight: दुबई-मुंबई इंडिगो फ्लाईटच्या टॉयलेटमध्ये प्रवाशाचे धुम्रपान; आरोपीला अटक)
गेल्या दोन महिन्यांत विविध फ्लाइट्समध्ये लैंगिक छळाच्या किमान चार घटना समोर आल्या आहेत. यापूर्वी 16 ऑगस्ट रोजी दिल्ली-मुंबई स्पाईसजेट फ्लाइटमध्ये कथित लैंगिक छळाचे प्रकरण समोर आले होते. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनीही या घटनेवर दिल्ली पोलीस आणि डीजीसीएला नोटीस बजावली होती.