Coronavirus: 'विप्रो' पुण्यात 450 बेडचं विशेष कोविड-19 रुग्णालय उभारणार; राज्य सरकारसोबत केला सामंजस्य करार
जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा क्षेत्रातील प्रसिद्ध 'विप्रो' (Wipro) कंपनीकडून पुण्याच्या हिंजवडी (Hinjawadi) येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये 450 खाटांचे विशेष कोविड-19 (Covid-19) रुग्णालय स्थापन करणार आहे. यासाठी विप्रोने महाराष्ट्र शासनासमवेत सामंजस्य करार केला आहे. विप्रोच्या या मानवतावादी योगदानामुळे आपली वैद्यकीय पायाभूत सुविधा आणखी मजबूत होईल आणि साथीच्या आजाराविरुद्धच्या लढाईत आघाडीवर असलेल्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वांनाच याचा लाभ होईल असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी व्यक्त केलं आहे.

दरम्यान, हे कोविड रुग्णालय या महिनाअखेर तयार होणार आहे. या रुग्णालयात मध्यम प्रकारच्या रुग्णांवर उपचार होणार आहे. गंभीर रुग्णांना तिसऱ्या टप्प्यातील वैद्यकीय सेवा केंद्रात हलवण्यापूर्वी त्यांची प्रकृती स्थिर करण्यासाठी या विशेष रुग्णालयात 12 बेड उपलब्ध करून देण्यात येणार आहे. हे कोविड-19 रुग्णालय आजारासाठी समर्पित असे स्वतंत्र कॉम्प्लेक्स असणार आहे. (हेही वाचा - धारावी मध्ये आढळले 33 नवे COVID-19 रुग्ण, कोरोना बाधितांची एकूण संख्या 665 वर)
जागतिक माहिती तंत्रज्ञान, सल्लामसलत व व्यवसाय प्रक्रिया सेवा क्षेत्रातील #विप्रो कंपनीकडून पुण्याच्या हिंजवडी येथील माहिती तंत्रज्ञान कॅम्पसमध्ये ४५० खाटांचे विशेष #कोविड१९ रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय. महाराष्ट्र शासनासमवेत केला सामंजस्य करार. pic.twitter.com/Xao1A51Nqr
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 5, 2020
या रुग्णालयासाठी नियुक्त केलेल्या डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या निवासासाठी या संकुलात 24 उत्तम खोल्यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आवश्यक वैद्यकीय व्यावसायिकांच्या सहाय्याने हे रुग्णालय त्वरित सुरु करण्यासाठी विप्रो तसेच प्रशासन आवश्यक असणारा कर्मचारी वर्ग नियुक्त करणार आहे. कोरोना विरुद्ध लढताना सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. या आपत्तीच्या प्रसंगात देशाप्रतिच्या समर्पित भावनेला कटिबद्ध राहून विप्रोकडून सहकार्य करण्यात येत आहे. या लढ्यात महाराष्ट्राच्या पाठीशी विप्रो खंबीरपणे उभी आहे, असं मत विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी व्यक्त केलं आहे. यापूर्वी विप्रोने कोविड-19 विरुद्ध लढताना 1125 कोटींचे योगदान दिलं आहे. याशिवाय विप्रोने मुंबई, पुणे, औरंगाबाद, अमळनेर, अहमदनगर, अकोला, बीड, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसह देशभरात मदत कार्य केलं आहे.
(The above story first appeared on LatestLY on May 05, 2020 08:50 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).