Winter Assembly Session: हिवाळी अधिवेशनापूर्वीच राज्यात राजकारण तापलं! सरकारकडून आयोजित चहापानावर विरोधकांचा बहिष्कार
पण विरोधकांकडून मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाचं राज्य सरकार विरुध्द बिगुल वाजवलं आहे.
उद्यापासून महाराष्ट्राच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. राज्याची उपराजधानी नागपूरात हे अधिवेशन पार पडणार असुन राज्य सरकार सह विरोधक या अधिवेशानासाठी सज्ज झालं आहे. गेल्या अधिवेशनातील सर्वाधिक लक्षात राहणारं वाक्य म्हणजे पन्नास खोके एकदम ओके. आता या अधिवेशनातही विरोधक शिंदे गटापुढे पन्नास खोक्यांचा नारा लावणार का किंवा शिंदे गट या आरोपाचं निरासरन करु शकणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. तर उद्यापासून सुरु होण्याऱ्या अधिवेशनाच्या पूर्व संध्येला चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची पध्दत आहे. पण विरोधकांकडून मात्र या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार करत अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाचं राज्य सरकार विरुध्द बिगुल वाजवलं आहे. तरी नागपूरातील गुलाबी थंडी असताना राजकीय वातावरण तापल्याचं चिन्ह आहे.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली आहे. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशन तिन आठवड्याचं घेण्यात यावं अशी मागणी केली आहे. तसेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला होणाऱ्या चहापानच्या कार्यक्रमावर आम्ही बहिष्कार घालत आहोत असही अजित पवारांकडून सांगण्यात आलं. तसेच या अधिवेशनात विरोधक नेमके कुठले मुद्दे मांडतील याबाबत देखील सविस्तर माहिती देण्यात आली. (हे ही वाचा:- एकनाथ शिंदे यांच्यासाठी धोक्याची घंटा; Devendra Fadnavis मख्यमंत्री व्हावेत, भाजप प्रदेशाध्यक्षांची भूमिका)
महापुरुषांबाबत वादग्रस्त वक्तव्य, महाराष्ट्र कर्नाटक सिमाप्रश्न,विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, शेतकऱ्यांचे कर्ज, महाराष्ट्रातील प्रकल्प आणि उद्योगधंदे, रोजगार हे मुद्दे विरोधक हिवाळी अधिवेशनात लावून धराणार असल्याची माहिती विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी दिली आहे. तरी उद्यापासुन महाराष्ट्राच्या राजकारणात हिवाळी अधिवेशना दरम्यान सत्ताधारी विरुध्द विरोधक अशी खडाजंगी बघायला मिळणार आहे. पण सर्वसामान्यांना या अधिवेशनातून काय मिळणार हे बघणं अधिक महत्वाचं ठरणार आहे.