महाराष्ट्रात Lock Down वाढणार का? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले 'हे' उत्तर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून भाष्य करता लॉक डाऊन वाढवायचा की नाही हे संपूर्णपणे लोकांच्या हातात आहे असे सांगितले आहे.
कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) भारतात लागू करण्यात आलेल्या लॉक डाऊनचा (Lock Down) आजचा 11 वा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे येत्या 14 एप्रिल पर्यंत हे लॉक डाऊन कायम असणार आहे. मात्र सद्य घडीला कोरोनच्या रुग्णांची वाढती संख्या पाहता निदान 14 एप्रिल नंतर तरी ते लॉक डाऊन काढले जाणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. अशातच आज महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी सुद्धा लॉक डाऊन वाढवला जाऊ शकतो असे संकेत दिले आहेत, याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी आपल्या फेसबुक लाईव्ह मधून भाष्य करता लॉक डाऊन वाढवायचा की नाही हे संपूर्णपणे लोकांच्या हातात आहे, 14 एप्रिल पर्यंत काटेकोरपणे जर का लोकांनी घरी राहून नियमांचे पालन केले तर स्थिती बरीच सुधारेल त्यामुळे पुढे काय होणार हे लोकांच्या वागणुकीवर अवलंबून आहे असे सांगितले. उद्धव ठाकरे यांच्या फेसबुक लाईव्ह मधील महत्वाचे मुद्दे जाणून घेण्यासाठी क्लिक करा
महाराष्ट्रात सध्याची कोरोना रुग्णांची आकडेवारी ही देशात सर्वाधिक आहे. आज शनिवारी सुद्धा मुंबई, पुणे, ठाणे जिल्ह्यांमधून कोरोनाचे 47 नवे रुग्ण समोर आल्याने कोरोना बाधितांचा आकडा हा 537 वर गेला आहे. याविषयी उद्धव ठाकरे यांनी भाष्य करताना लोकांच्या चाचणीची संख्या वाढल्याने कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढतेय असे सांगितले.
PTI ट्विट
दरम्यान, कोरोनमुळे आलेल्या संकटावर अजूनही आपण घरी राहून विजय मिळवू शकतो असा विश्वास मुख्यमंत्रीनी या आजच्याफेसबुक लाइव्हच्या माध्यमातून दाखवला आहे. तसेच कोरोनाचे कॉमन टार्गेट असणाऱ्या वृद्धांची विशेष काळजी घ्या असे आवाहन सुद्धा जनतेला करण्यात आले आहे. राज्यात आणि विशेषतः मुंबई मध्ये कोव्हिड 19 वरील उपचारासाठी खास रुग्णालय उभारण्यात आले आहे त्यामुळे सर्दी,खोकला, न्यूमोनिया किंवा तत्सम लक्षणे दिसताच सामान्य क्लिनिक मध्ये जाण्याऐवजी या खास रुग्णालयात नागरिकांनी जावे असेही ठाकरे यांनी सांगितले.