Chandrakant Patil On Uddhav Thackeray: माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरेंना फोन करणार; बाबरी मशीद आणि बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत केलेल्या विधानानंतर चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

जे लोक संघर्षात सामील होते ते हिंदू होते आणि त्यांना शिवसेना किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून वेगळे करता येणार नाही.

Chandrakant Patil (Photo Credit - Facebook)

Chandrakant Patil On Uddhav Thackeray: उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेना (Shivsena) आणि बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं. बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकाचा काहीही संबंध नाही, असा खळबळजनक दावा पाटील यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यांनंतर आता राजकीय वातावरण चांगलंच पेटल आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना फोन करणार असल्याचे सांगितले.

या विषयावर माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना फोन करणार आहे. माझ्या मनात बाळासाहेब ठाकरेंबद्दल पूर्ण आदर आहे आणि मी त्यांचा अनादर करू शकत नाही. मुंबई दंगलीत (1993 मध्ये) हिंदूंना वाचवण्यात त्यांनी दिलेले योगदान कोणीही विसरू शकत नाही. पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले. (हेही वाचा - Swatantra Veer Gaurav Din: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्र राज्य शासना कडून 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा  होणार - CM Eknath Shinde यांची घोषणा)

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मला आज सकाळी फोन केला आणि माझी भूमिका स्पष्ट करण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यास सांगितले. जे लोक संघर्षात सामील होते ते हिंदू होते आणि त्यांना शिवसेना किंवा भाजपचे कार्यकर्ते म्हणून वेगळे करता येणार नाही. बाबरी मशीद पाडण्याच्या लढ्याचे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने (विहिप) केले होते, आणि प्रत्येकजण त्यांच्या बॅनरखाली काम करत होता. मशीद पाडत असताना उपस्थित असेलेला प्रत्येकजण हिंदू होता, असंही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, संजय राऊत विध्वंसाच्या वेळी कुठे होते? हा माझा प्रश्न होता आणि तो प्रश्न आजही तसाच आहे. 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या बाबरी मशीद पाडण्यात बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेची भूमिका नव्हती. त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरे गटाकडून पाटील यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif