Eknath Shinde Press Conference: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री निवडण्याचे सर्वाधिकार PM नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना- एकनाथ शिंदे

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारपरिषदेत याबाबत भाष्य केले.

Eknath Shinde | (Photo Credit- X)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी फोन करुन संवाद साधला. राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी माझा कोणताही अडसर असणार नाही. आपणास जो कोही निर्णय घ्यायचा असेल तो आपल्याला मान्य असेल, असे आपण या संवादावेळी त्यांना सांगितले, असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी म्हटले आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे वरीष्ठ नेते राज्यात सत्ता स्थापन करण्यासाठी, मुख्यमंत्री बनविण्यासाठी जो काही निर्णय घेतील, तो एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षास मान्य असेल, असेही त्यांंनी सांगिले. विधानसभा निवडणूक 2024 चा निकाल लागल्यानंततर एकनाथ शिंदे यांनी प्रथमच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. या वेळी ठाणे येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

स्वत:ला कधी मुख्यमंत्री समजलो नाही

ठाणे येथील पत्रकार परिषदेमध्ये बोलताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पाठिमागील अनेक वर्षांमध्ये विधनसभा निवडणुकीत प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर जनतेने विजय मिळवून दिला. महायुतीला मोठ्या प्रमाणावर यश मिळवून दिले याबद्दल सर्व जनतेचे आभार. जनतेने दिलेल्या प्रेमामुळेच 'लॅण्डस्लाईड' विजय मिळवून दिला. मुख्यमंत्री असताना मी सामान्य नागरिक म्हणूनच वावरत होतो. त्यामुळे मला जनतेमध्ये जाताना कॉमन मॅनच असे. मी कधीही मुख्यमंत्री म्हणून वावरलो आहे. निवडणूक काळात पायाला भिंगरी लावून फिरलो. कार्यकर्त्यांसारकेच काम केले. राज्यात जवळपास 90 सभा घेतल्या. त्यामुळेच राज्यात आणि केंद्रात एकाच विचाराचे सरकार येऊ शकले, असे ते म्हणाले. (हेही वाचा, Eknath Shinde यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; सध्या राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून सांभाळणार जबाबदारी)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखवला

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिखे यांनी दाखवलेला विचार यावरुन आम्ही मार्गक्रमण केले. मुख्यमंत्री असतानाच्या काळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. हे काम करण्यासाठी पाठिमागेच अडिच वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवला. त्यामुळेच मी हे काम करु शकलो. महाविकासआघाडी सरकारने थांबवलेली कामे महायुतीचे सरकार पुन्हा एकातच परत एकदा वेगाने सुरु झाली. आम्ही राज्य पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकात आणू शकलो, केलेल्या कामाबद्दल मी प्रचंड समाधानी आहे, असेही काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. (हेही वाचा, Ramdas Athawale On New Maharashtra CM: एकनाथ शिंदे नाराज! देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनणार; रामदास आठवलेंचा दावा)

पत्रकार परिषदेत बोलताना एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदावरुन नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, संख्याबळअधिक असल्याने या वेळी भाजपचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी जोरदार मागणी भाजप आमदारांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि त्यांचा शिवसेना पक्ष काय भूमिका घेतो याबाबत उत्सुकता होती. ज्यावर स्वत: शिंदे यांनीच आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाष्य केले.