भंडारा जळीत कांडात प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सेसला बळीचा बकरा बनवण्यात आलंय- चंद्रशेखर बावनकुळे
या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत दोन नर्सेसला बळीचा बकरा बनविण्यात आले अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bhawankule) दिली आहे.
भंडारा जिल्ह्यात (Bhandara Hospital Fire Case) 8 जानेवारी 2021 ला जिल्हा सामान्य रुग्णालयातील नवजात बालकांच्या कक्षाला लागलेल्या आगीने संपूर्ण देश हादरला. या दुर्घटनेत 10 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाला. सदर घटनेत आज 2 कंत्राटी नर्सेसवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेला प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत दोन नर्सेसला बळीचा बकरा बनविण्यात आले अशी प्रतिक्रिया भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bhawankule) दिली आहे. या दोन नर्सेसवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भंडारा जिल्ह्यातल्या शासकीय रुग्णालयात आग लागून नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला, रुग्णालयातल्या 2 परिचारिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचं चौकशीत समोर आलं आलं आहे. यानंतर या दोन्ही परिचारिकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.हेदेखील वाचा- Bhandara Hospital Fire: भंडारा येथील नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी 2 नर्सवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
या घटनेदरम्यान अग्निशमन यंत्रणा चालत नव्हती, प्रशासन जबाबदार असताना फक्त दोन नर्सला बळीचा बकरा बनवण्यात आलंय, असा आरोप भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
दरम्यान, या प्रकरणाची पुन्हा चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी खासदार सुनील मेंढे यांनी केली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सकासह 7 लोकांवर निलंबनाची कार्यवाही केली होती. यासंदर्भात 39 एफआयआर दाखल करण्यात आला, त्यात दोन कंत्राटी कर्मचारी स्मिता आंबीलढुके आणि शुभांगी साठवने यांचा समावेश असून दोषी डॉक्टराना मात्र वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोप मेंढे यांनी केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेतील पीडित कुटुंबाना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. त्यानंतर आता केंद्र सरकारने पीडित कुटुंबाना मदतीचा हात दिला. या दुर्घटनेतील पीडित कुटुंबांना पंतप्रधान निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली.