पुणे येथे दुकानात गॅस भरताना भीषण स्फोट, जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल

पुणे येथील एका दुकानात अनधिकृतरित्या एलपीजी गॅस भरत असताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो सौजन्य- Pixabay

पुणे येथील एका दुकानात अनधिकृतरित्या एलपीजी गॅस भरत असताना भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या स्फोटात दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

उंड्री येथील अतूर नगर येथील सोसाटीच्या दुकानात गॅस भरण्याचे काम चालू होते. त्यावेळी गॅस गळती झाल्याने कळून न आल्याने अचानक स्फोट झाला आहे. तसेच दुकानाचे शटर संपूर्ण तुटून बाहेर पडले आहे. या प्रकरणी तातडीने घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या उपस्थित राहून आग विझवण्याचे कार्य सुरु करण्यात आले.

अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना तीन मोठे गॅस सिलेंडर आढळून आल्याने त्वरीत होणारी गॅस गळती थांबिवली. तसेच दुकानात अजून लहान 20 सिलेंडर असल्याने तेही दुकानाबाहेर काढण्यात आले.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement