28 सप्टेंबरला देशभरात मेडिकल स्टोअर्स राहणार बंद, अशावेळेस मुंबईत कुठे मिळतील औषधं ?
महाराष्ट्रातील मेडिकल स्टोअर्सही बंदामध्ये सहभागी झाल्याने उद्या गैरसोय टाळण्यासाठी या ठिकाणी औषधांची सोय केली जाणार आहे.
ऑल इंडिया ऑर्गॅनायझेशन ऑफ केमिस्ट आणि ड्रगिस्टने पुकारलेल्या संपामध्ये उद्या महाराष्ट्र केमिस्ट आणि ड्रगिस्टनेही सहभाग घेतला आहे. यामुळे उद्या 28 सप्टेंबर रोजी महाराष्ट्रभर मेडिकल स्टोअर्स बंद ठेवली जाणार आहेत. ऑनलाईन स्वरूपात प्रिस्क्रिब्शनशिवाय काही साईट्सवर औषधं विकली जातात. या विरोधात केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनने बंद पुकारला आहे.
मेडिकल स्टोअर्स राहणार बंद
महाराष्ट्रभरातून मेडिकल स्टोअर्सनी या संपात उतरण्याचा इशारा दिल्याने रूग्णांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. दरम्यान अत्यावश्यक औषधांचा मुबलक साठा ठेवा असे आवाहनही यापूर्वी करण्यात आले होते. मात्र उद्या मेडिकल स्टोअर्स बंद ठेवण्यात येणार असल्याने रूग्णांची गैरसोय टाळण्यासाठी काही खास केंद्रांवर औषधं उपलब्ध असणार आहेत.
पहा मुंबईत कुठे मिळतील औषधं
कोणत्या वेळेत बंद राहतील मेडिकल स्टोअर्स ?
देशभरात चालणारा फार्मसी संप २७ तारखेला रात्री बारा वाजल्यापासून २८ ला रात्री बारा वाजेपर्यंत सुरू राहील.