हवामान अंदाज: आभाळात मेघांची दाटी, पाऊस मुसळधार बरसण्याच्या तयारीत; काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
भारतीय हवामान विभाग अर्थातच आयएमडीने (IMD Weather Forecast) सुद्धा अशीच शक्यता वर्तवली आहे.
राज्यात सुरु असलेला मान्सून (Monsoon 2024) प्रदीर्घ विश्रांतीनंतर पुनरागमनाच्या तयारीत आहे. आजपासून तो पुन्हा एकदा अस्तित्व दाखविण्यासाठी सज्ज झाला असून, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस (Heavy Rain In Maharashtra) बरण्याची शक्यता आहे. या काळात वातावरण थंड आणि आकाश ढगाळ राहील. तसेच, राज्यातील आज आणि उद्याचे हवामान (Maharashtra Tomorrow's Weather Forecast) पर्जन्यवृष्टीस अनुकुल राहील असे आयएमडीचे (IMD) संकेत आहेत. काही जिल्ह्यांसाठी संभाव्य परिस्थितीचा विचार करुन ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी करण्यात आला आहे. जाणून घ्या राज्यातील हवामान आणि पावसाची स्थिती.
समुद्रात कमी दाबाचा पट्टा
आयएमडीने वर्तवलेल्या अंदाजानुसार, अंदमान बेट आणि समुद्रात हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. ज्यामुळे महाराष्ट्रात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी मेघराजा दमदार बरसण्याच्या तयारीत आहे. आजपासून पुढचे चार ते पाच दिवस राज्यातील बहुतांश भागात पाऊस आपले अस्तित्व दाखवून देण्याची शक्यता आहे. अर्थात त्यात रिमझीम, हलका ते मध्यम आणि मुसळधार पाऊस अशी विविधता पाहायला मिळू शकते. (हेही वाचा, हवामान अंदाज: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रीय, 23 ते 27 सप्टेंबरपर्यंत राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा)
पावसासाठी अनुकुल वातावरण
हवामान विभाग पुणे शाखेने वर्तवलेल्या अंदाजात म्हटले आहे की, मान्सून 2024 आता परतीच्या विचारात आहे. त्यामुळे येत्या 23 सप्टेंबरपासून पश्चिम राजस्थानातून त्यासाठी आवश्यक वातावरण निर्माण होऊ शकते. त्याचा परीणाम म्हणून गोवा आणि कोकण परिसरात हलका ते मध्यम किंवा तुरळत पाऊस पाहायला मिळू सकतो. दरम्यान, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या विभागांमध्ये मात्र पुढचे तीन दिवस मुसळधार पाऊस कसळू शकतो. (हेही वाचा, Monsoon 2024: भारतामध्ये यंदा ऑगस्ट महिन्यात15.7% सरासरी पेक्षा अधिक पाऊस; IMD ची माहिती)
आयएमडीकडून काही जिल्ह्यांना इशारा
दरम्यान, हवामान विभागाने संभाव्य स्थितीचा विचार करुन काही जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ते जिल्हे खालील प्रमाणे:
- 24 सप्टेंबर: रायगड, परभणी, हिंगोली, नांदेड
- 25 सप्टेंबर: पालघर, ठाणे, पुणे
- 26 सप्टेंबर: नाशिक (मेघ गर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता)
राज्यातील हवामान: पुढचे पाच दिवस
संपूर्ण महाराष्ट्रातील पावसाची थोडक्यात स्थिती
हवामान विभागाने म्हटले आहे की, राज्यात पावसासाठी पोषक झालेले वातावरण पुढचे चार ते पाच दिवस कायम राहील. आज म्हणजेच सोमवार (23 सप्टेंबर) पासून पावसाला सुरुवात होण्याची शक्यता असून, मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस उपस्थिती दर्शवू शकतो. रायगड, सिंधुदुर्ग, अहमदनगर, पुणे, सोलापूर, बीड, हिंगोली आणि नांदेड या भागांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळाचा अंदाज आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशीम आणि यवतमाळ येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.