Weather Update: हिवाळ्यात पावसाळा! राज्यात पावसाच्या सरी कोसळणार, हवामान विभागाचा महत्वपूर्ण अंदाज
२७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
जानेवारी संपूर्ण महिनाभरातचं राज्यातील विविध भागात कडाक्याची थंडी पडताना दिसत आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये निच्चांकी तापमानाची नोंद झाली असुन संपूर्ण महाराष्ट्र थंडीने गारठला आहे. तरी आता थंडी पाठोपाठचं राज्यभरात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अचानक पडणाऱ्या या पावसामुळे राज्यातील तापमानावर आणि शेतात डोलावणाऱ्या पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. तरी मराठवाडा आणि विदर्भात हलक्या मध्यम पावसाची शक्यता आणि ढगाळ वातावरणाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या दरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र या भागात सध्या कडाक्याची थंडी पडत असुन सर्वत्र धुक्याची चादर बघायला मिळत आहे. तरी पावसाच्या अंदाजा नंतर राज्यातील तापमानात बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
देशातील अनेक भागात तापमानाचा पारा घसरला आहे. त्यामुळं हुडहुडी वाढली आहे. पंजाबच्या अनेक भागात दाट धुके कायम राहण्याचा अंदाज आहे. तसेच उत्तराखंड, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानच्या विविध भागात धुके पडण्याची शक्यता आहे. संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याची थंडी जाणवत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये अचानक थंडीचा जोर वाढला आहे. उत्तर भारतात आणखी थंडी वाढण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पुढच्या तीन ते चार दिवसात उत्तर-पश्चिम भारतात दाट धुके पडण्याची शक्यता आहे. (हे ही वाचा:- Watch Video: 25 वर्षिय तरुणाने अवघ्या 11 मिनिटांत सर केला 3100 फूट उंच लिंगाणा सुळका डोंगरी किल्ला; पहा चित्तथरारक व्हिडीओ)
राज्यात कितीही थंडी पडली तर मुंबईत मात्र दरवर्षीचं फारशी थंडी नसते. तरी हा वर्षिच्या हिवाळ्याने मात्र गेल्या कित्येक वर्षातील तापामानाचे आकडे मोडत यावर्षी राज्याची राजधानी मुंबईने देखील थंडीचे सगळेचं रेकॉर्डस ब्रेक केले आहे. तरी या आठवड्यात मुंबई शहरासह उपनरात कडाक्याची थंडी पडणार असल्याची शक्यता हावामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. मुंबई शहरात यावर्षीच्या हिवाळ्याती सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. विशेष दक्षिण मुंबईत सर्वात निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. येणाऱ्या काही दिवसांत मुंबईतील किमान तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज मुंबई प्रादेशिक हवामान केंद्रानं व्यक्त केला आहे.