Maharashtra Weather Update: उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यात तापमानात होणार किंचित घट, हवामान विभागाचा अंदाज

पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे.

Cold | Representational image (Photo Credits: pixabay)

पुढील काही दिवसात राज्यातील तापमानात घट (Weather Update) होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात तापमानात घट (Cold Weather) होण्याचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे. उत्तर भारतासह राज्यात सर्वत्र थंडीची लाट (Cold Wave) पसरली आहे. राज्यात उत्तर आणि मध्य महाराष्ट्रासह विदर्भ, मराठवाड्यातही तापमानात किंचित घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान उत्तर भारताच्या काही भागांमध्ये, मध्य भारताच्या काही भागांसह उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये किमान तापमानात थोडीशी घट होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. (हेही वाचा - Maharashtra Weather Update: उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात गारठा कायम)

मुंबईतील तापमानात देखील कमालीची घट पाहायला मिळत आहे. पुणे, अहमदनगर, सातारा, जळगावसह मुंबईमध्ये किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. देशासह राज्यातील तापमानात मोठी घट झाली आहे. गेल्या काही दिवसात कोकणात किमान तापमानात मोठी घट झाली आहे.

पाहा पोस्ट -

नवी दिल्ली आणि उत्तर भारतातील अनेक भागात धुक्याचा दाट थर पसरला आहे, यामुळे दृश्यमानतेवर परिणाम झाला आहे. दाट धुक्यामुळे विमान प्रवास आणि रेल्वे उशिराने सुरु आहे. बुधवार आणि गुरुवारी उत्तर प्रदेश आणि बिहारच्या काही भागांमध्ये सकाळच्या वेळी दाट धुके असण्याची शक्यता आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif