Maharashtra Weather Forecast: महाराष्ट्रातील हवामान अंदाज, मुसळधार पाऊस, वादळी वारे, काही ठिकाणी तापमान वाढ; घ्या जाणून

नैर्ऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ घातला आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी आयएमीडी हवामान (Weather Forecast Of Maharashtra) अंदाज वास्तववादी ठरत मुसळधार पाऊस (Pre Monsoon Rain) बरसला आहे.

Weather Forecast | Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: Pixabay)

Monsoon Rain in Maharashtra: नैर्ऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून महाराष्ट्रात दाखल होऊ घातला आहे. दरम्यान, राज्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. अनेक ठिकाणी आयएमीडी हवामान (Weather Forecast Of Maharashtra) अंदाज वास्तववादी ठरत मुसळधार पाऊस (Pre Monsoon Rain) बरसला आहे. तर काही भागांमध्ये पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. दुसऱ्या बाजूला राज्यातील तापमानही कमालीचे घटत असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळू लगला आहे. वातावरणही ढगाळ आहे. काही ठिकाणी मात्र उन्हाचा जोर कायम असून तापमान स्थिर आहे. अशा ठिकाणी अद्यापही उकाडा कायम आहे.

पश्चिम महाराष्ट्रात वादळी पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात उष्णतेमुळे वाढलेली धग कमी होऊन वातावरणात गारवा पाहायला मिळत आहे. हवामान बदलत असल्याने तापमानही घटले असून आकाश ढगाळ आहे. विशेषत: पुणे, सांगली, सोलापूर जिल्ह्यांतील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह दमदार पाऊस पडला आहे. पुणे जिल्ह्यात तर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाळा अद्याप सुरु व्हायला काहीसा अवकाश असला तरीसुद्धा सातारा जिल्ह्यातील कराड परिसरात धुके पाहायला मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळाली. सलग तीन तास पडलेल्या पावसामुळे हलकर्णी ते बसर्गे रोडवरील ओढ्यावर पाणी पाहायला मिळाले. त्यामुळे ओढ्यावरुन होणारी वाहतूक पुढचे काही काळ स्थगित ठेवण्यात आली होती. पाणी कमी झाल्यानंतर ही वाहतूक पूर्ववत झाली. (हेही वाचा, Mumbai Weather Prediction Today: हवामान विभागाकडून मुंबई शहराला आज यलो अलर्ट; 80% जोरदार पावसाचा अंदाज)

महाराष्ट्रात मान्सून दाखल, पण केव्हा?

मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे. येत्या 8 ते 10 जून रोजी तो महाराष्ट्रातही दाखल होणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. त्यामुळे पुढच्या तीन ते चारच दिवसांमध्ये महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस सुरु होईल. यंदाच्या वर्षी राज्यभरात पाऊस समाधानकारक असेल असा अंदाज आहे. दरम्यान, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली आहे. (हेही वाचा, Mumbai Weather Forecast For Tomorrow: मुंबईचे उद्याचे हवामान काय असेल? इथे पहा हवामान अंदाज!)

दरम्यान, मुंबई शहरातही हलक्या ते मध्यम स्वरुपातील पावसाच्या सरी बसल्याचे आज (6 जून) पाहायला मिळाले. यंदाच्या वर्षी उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांची उकाड्याने काहीली झाली. दरवर्शीच्या तुलनेत यंदाचा उन्हाळा काहीसा अधिकच कडक होता. भौगोलिक पिरिस्थितीमुळे आगोदरच असलेले दमट वातावरण त्यातच वाढते तापमान यामुळे मुंबईकरांना यंदा उकाड्याचा त्रास अधिक सहन करावा लागला. दरम्यान, पाठिमागच्या आठवड्यापासून हलक्या ते मध्यम आणि तुरळक स्वरुपात का होईना पावसाचा शिडकाव झाला. त्यामुळे शहरातील तापमान कमी होऊन नागरिकांना काही प्रमाणात तरी उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement