Ajit Pawar On Muslim Quota: मुस्लिम कोट्याचा मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडू; अजित पवार यांचे महत्त्वपूर्ण वक्तव्य
त्यांनी मला सांगितले की, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यावर ते सहमत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांनी सुरळीत सहकार्य आणि एकत्रित काम करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.
Ajit Pawar On Muslim Quota: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचे मंत्री आणि अधिकार्यांशी बैठक घेतली. पुढचा रस्ता शोधण्यासाठी मुस्लिम कोट्याचा (Muslim Quota) मुद्दा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे मांडू, असं आश्वासन अजित पवार यांनी केलं आहे. पुण्यात पत्रकारांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, त्यांनी अलीकडेच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तार, संबंधित विभागाचे अधिकारी आणि काही संघटनांच्या प्रतिनिधींसोबत मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर बैठक घेतली. मौलाना आझाद मंडळ, वक्फ बोर्डाच्या मालमत्ता आणि इतर मुद्द्यांवर बैठकीत चर्चा झाली, असे अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
मुस्लिमांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये (यूपीए सरकार असताना) कोटा देण्यात आल्याची आठवण अजित पवार यांनी सांगितली. उच्च न्यायालयाने (मुस्लिमांसाठी) शिक्षणात आरक्षण मान्य केले, पण नोकऱ्यांमधील कोटा नाकारला. समान शिक्षणासाठी सरकारने नंतर शिक्षणाचा अधिकार (आरटीई) कायदा आणला, असे अजित पवार यांनी यावेळी नमूद केले. (हेही वाचा - Shah Rukh Khan मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी, गणपती बाप्पाचे घेतले दर्शन; पहा व्हिडिओ)
मुस्लिमांना आरक्षण मिळावे हे सत्तार आणि दुसरे मंत्री हसन मुश्रीफ यांचे मत असल्याचे अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. परंतु, हे तीन पक्षांचे सरकार असल्याने मी हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. अजित पवार म्हणाले की, शिवसेना-भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर एका वर्षानंतर मी त्यात सामील झालो आणि दोन्ही पक्षांमध्ये (भाजप आणि शिवसेना) समजूतदारपणा झाला आहे.
सरकारमध्ये सामील झाल्यानंतर, मी मुख्यमंत्री शिंदे आणि डीसीएम देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यांनी मला सांगितले की, राज्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे यावर ते सहमत आहेत. शिंदे आणि फडणवीस यांनी सुरळीत सहकार्य आणि एकत्रित काम करण्याचे आश्वासन दिले असल्याचेही अजित पवार यांनी यावेळी सांगितलं. तीन पक्षांची मते भिन्न आहेत असा कोणताही मुद्दा पुढे आला तर आम्ही (शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी) बसून तोडगा काढू आणि गरज पडल्यास हा मुद्दा उच्च पातळीवर नेऊ शकतो, असंही अजित पवार यांनी यावेळी नमूद केलं.