No Water Supply In Pune: गुरूवारी पुण्यातील 'या' भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद, पुणे महानगरपालिकेची माहिती
पुणे ({Pune) शहराच्या काही भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही, असे पुणे महापालिकेच्या (PMC) जलविभागाचे (Water Department) निवेदनात स्पष्ट केले आहे. पुणे महानगरपालिकेने गुरुवारी पर्वती, वडगाव आणि कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत आणि बांधकाम संबंधित उपक्रमांचे नियोजन केले आहे.
पुणे (Pune) शहराच्या काही भागांना गुरुवारी पाणीपुरवठा होणार नाही, असे पुणे महापालिकेच्या (PMC) जलविभागाचे (Water Department) निवेदनात स्पष्ट केले आहे. पुणे महानगरपालिकेने गुरुवारी पर्वती, वडगाव आणि कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत आणि बांधकाम संबंधित उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रांवर अवलंबून असलेल्या भागांना पाणीपुरवठा होणार नाही. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली. हेही वाचा Corona Vaccination Update: येवल्यामध्ये 15 वर्षीय मुलाला चुकीची लस दिल्याचा प्रकार उघडकीस, प्रशासनाचा निष्काळजीपणा आला समोर
निवेदनानुसार, सर्व पेठ परिसर, शिवाजीनगर, लोकमान्यनगर, स्वारगेट, मुकुंदनगर, भवानी पेठ परिसर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, मगरपट्टा शहर, सोलापूर रस्ता, मुंढवा, उरुळी देवाची, हिंगणे, आनंदनगर, कात्रज, आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि कोंडवा परिसर. पाणीपुरवठा होणार नाही.
(The above story first appeared on LatestLY on Jan 03, 2022 07:08 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

