Water Cut in Navi Mumbai Today: कंटेनर चालकाचा वाहनावरिल सुटला ताबा; थेट पाईपलाईनला आदळला, पाईपलाईन फुटल्यामुळे 'या' भागात पाण्याची टंचाई
आणि पाईपलाईन फुटल्यांमुळे नागरिकांना पाणी पुरवढा कमी होणार आहे.
Water Cut in Navi Mumbai Today: उरणमधील चिरनेर येथे गुरुवारी सायंकाळी हेटवणे धरणाची पाइपलाइन फुटल्याने खारघर, कामोठे, कळंबोली, द्रोणागिरी आणि उलवे या परिसरात पाणीपुरवठा शनिवारपर्यंत कमी होण्याची शक्यता दर्शवली आहे.सिडकोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पाण्याच्या पाईपलाईनला कंटेनर आदळल्याने मोठा पाइप फुटला. गुरुवारी सायंकाळी 6.40 वाजता ही घटना घडली. या परिसरात शनिवार पर्यंत पाणी टंचाई होणार आहे अशी माहिती अधिकारांने दिली आहे. अधिकारांने या संदर्भात माहिती घेताच लवकरच पाईपलाइन दुरुस्ती करण्यात येईल अशी माहिती वृत्तसंस्थांना दिली आहे. कंटेनर चालकाचे वाहनावरील ताबा सुटून पाईपलाईनच्या एअर व्हॉल्व्हला धडकल्याने लाखो लिटर पाण्याचे नुकसान झाले. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे.