No Water Supply In Mumbai: मुंबईत 27,28 जानेवारीला 'या' परिसरात पाणी पुरवठा राहणार पुर्णपणे बंद

ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील (Trombay High Reservoir) इनलेट्स व्हॉल्व्ह (Inlets valve) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे

Tap Water. Representational Image. (Photo Credits: File Image)

बीएमसीने (BMC) 27 जानेवारी ते 28 जानेवारीपर्यंत काही भागात पाणीकपात (Water loss) आणि कमी दाबाने पाणीपुरवठा (Water supply) करण्याची घोषणा केली. ट्रॉम्बे उच्चस्तरीय जलाशयातील (Trombay High Reservoir) इनलेट्स व्हॉल्व्ह (Inlets valve) बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. ई प्रभागातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम सुरू आहे. एम/पूर्व आणि एम/पश्चिम भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे खंडित केला जाईल. या विभागांमधील परिसरात 18 तासांसाठी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणीकपातीच्या आदल्या दिवशी सर्व संबंधित नागरिकांना खबरदारीचा उपाय म्हणून जास्तीत जास्त पाणी साठवण्याची विनंतीही बीएमसीने केली आहे. पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पुढील दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.

टाटानगर, गोवंडी स्थानक मार्ग; प्रभाग क्रमांक 141 - देवनार महानगरपालिका वसाहत, लल्लूभाई कंपाऊंड; प्रभाग क्रमांक 142 - लल्लूभाई कंपाऊंड, हिरानंदानी इमारत; प्रभाग क्रमांक 143 - जॉन्सन जेकब मार्ग (ए, बी, आय, एफ सेक्टर), एसपीपीएल इमारती, म्हाडा इमारती, महाराष्ट्र नगर; प्रभाग क्रमांक 144 - देवनार गाव रस्ता, गोवंडी गांव, व्ही. एन. पूरव मार्ग, बीकेएसडी मार्ग याठिकाणी पाणी पुरवठा बंद असेल. हेही वाचा BMC Instructions: बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुख्य विद्युत निरीक्षकांना दिले इमारतींचे इलेक्ट्रिकल ऑडिट करण्याचे निर्देश

तर दूरसंचार कारखाना परिसर, मंडाला गांव, मानखुर्द नौदल, संरक्षण क्षेत्र, मानखुर्द गांव, गोवंडी स्थानक मार्ग, टि. आय. एफ. आर. वसाहत; प्रभाग क्रमांक 145 - सी-सेक्टर, डी-सेक्टर, ई-सेक्टर, जी-सेक्टर, एच-सेक्टर, जे-सेक्टर, के-सेक्टर, कोळीवाडा ट्रॉम्बे, कस्टम मार्ग, दत्त नगर, बालाजी मंदीर मार्ग, पायलीपाडा, चिता कॅम्प ट्रॉम्बे; प्रभाग क्रमांक 146 - देवनार फार्म मार्ग, बोरबादेवी नगर, बी. ए. आर. सी. (BARC) फॅक्टरी, बी. ए. आर. सी. (BARC) वसाहतीतही पाणीपुरवठा होणार नाही.

साईबाबा नगर आणि श्रमजीवी नगर, प्रभाग क्रमांक 152 - सुभाष नगर, चेंबूर गावठाण, स्वस्तीक पार्क, सिद्धार्थ वसाहत, सुमन नगर; प्रभाग क्रमांक 153 - घाटला अमर नगर, मोती बाग खारदेव नगर, वैभव नगर, मैत्री पार्क, अतूर पार्क; प्रभाग क्रमांक 154 - चेंबूर कॅम्प, युनियन पार्क लाल वाडी; प्रभाग क्रमांक 155 - लाल डोंगर या परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे.