No Water Supply In Pune: जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्ती कामासाठी 5 मे रोजी पुण्यात 'या' भागात पाणीपुरवठा राहणार बंद

या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने आखले आहे.

Water | Representational Image | (Photo Credits: stux/Pixabay)

वडगाव आणि भामा आसखेड जलशुद्धीकरण (Water purification) केंद्रांवर अवलंबून असलेल्या पुणे भागात 5 मे रोजी पाणीपुरवठा होणार नाही, असे पुणे महानगरपालिकेने (PMC) नोटीसमध्ये नमूद केले आहे. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने आखले आहे. वडगाव जल केंद्रावरील विद्युत/पंपिंग आणि वास्तुशिल्पीय कामांची तातडीची देखभाल व दुरुस्तीच्या कामामुळे आणि विमान नगर आणि धानोरी टाकी लगतचा परिसर, वरील पंपिंगच्या देखभाल व दुरुस्तीच्या कामासाठी पुणे शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे. तसेच शुक्रवारी 6 मे रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होणे अपेक्षित आहे. हेही वाचा Nagpur: महिलेने आधी चार पुरूषांशी केले लग्न, नंतर पतींकडून खोटे आरोप लावत वसूल केली खंडणी

तरी सर्व नागरिकांनी याची नोंद घ्यावी व सहकार्य करण्याची पीएमसीने विनंती केली आहे. हिंजणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पाथर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ, कोंढवा, संजय पार्क, विमाननगर, म्हाडा कॉलनी, धानोरी, कमल पार्क, परांडे नगर, सुदामा नगर, हरिकृष्ण पार्क भागात पाणी मिळणार नाही. याच भागात शुक्रवारी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.