Mumbai Rain Update: दादर मधील हिंदमाता भागात मुसळधार पावसामुळे वॉटर लॉगिंग, Watch Video

त्यामुळे लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये आणि सतर्कता बाळगावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

Hindmata Water Logging (Photo Credits: ANI)

मुंबईच्या अनेक भागात आज सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले. गेल्या दिवसांपासून तापमानात वाढ झाल्यामुळे मुंबईकर (Mumbaikar) घामांच्या धारांनी त्रस्त झाले होते. त्यात आज पडलेला पाऊस मुंबईकरांसाठी सुखावह होता. मध्य उपनगरातील सायन, माटुंगा, शिवाजी पार्क ते दक्षिण मुंबईमध्ये सीएसएमटी (CSMT) परिसरात पावसाने जोर धरलेला होता. यामुळे दादरच्या हिंदमाता (Hindmata) परिसरात वॉटर लॉगिंगची समस्या निर्माण झाली होती.

मुंबईतील पावसाचा हा जोर पुढील 1-2 दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये आणि सतर्कता बाळगावी असे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. Mumbai Rains: मुंबई मध्ये जोरदार पावसाला सुरूवात; पुढील 48 तास जोर कायम राहण्याची शक्यता

पावसाचा ऑरेंज अलर्ट पाहता बीएमसीने काही खबरदारीचे उपाय जारी केले आहेत. दरम्यान शहराला कोविड19 चा विळखा असताना पावसामुळे अन्य आजारांनी डोकेदुखी वाढू नये म्हणुन मुंबईकरांच्या वर्दळीवर देखील बंधनं घालण्यात आली आहेत.

Mumbai Monsoon 2020: मुंबईत मुसळधार पाऊस; हिंदमातासह सखल भागात पाणी साचले, पाहा व्हिडिओ - Watch Video 

मुंबईमध्ये सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर सकाळी 9 वाजल्यापासून पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईमध्ये 11 जूनला मान्सूनचं आगमन झालं होतं. मात्र पाऊस अधूनमधून येऊन जात होता. अजुनही शहरात जोरदार पाऊस झालेला नाही. अचानक पाऊस दडी मारत असल्याने मागील आठवड्यात अनेक मुंबईकर उकाड्याने वैतागले होते.