मुंबई: माटुंग्यात येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद

येत्या 9 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी सकाळी 10 पर्यंत माटुंग्यातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

मुंबई: माटुंग्यात येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद
water tap | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

मुंबईतील माटुंगा (Matunga) परिसरात येत्या 9 आणि 10 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद (Water Cut) ठेवण्यात आला आहे. रावळी उच्चस्तरीय जलाशय येथे 900 मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीतून गळती होत असून तिच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेच्या जल विभागाने (BMC Water Department)  घेतला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी याबाबत नोंद घ्यावी आणि पाण्याचे नियोजन त्यानुसार करावे असे महापालिकेकडून सांगण्यात येत आहे. येत्या 9 फेब्रुवारीला म्हणजेच बुधवारी सकाळी 10 वाजल्यापासून गुरुवारी म्हणजेच 10 फेब्रुवारी सकाळी 10 पर्यंत माटुंग्यातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

माटुंग्यातील काही परिसरात पाणीपुरवठा बंद करण्यात आला असून या दिवशी परळ परिसरातही कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जलाशय दुरुस्तीच्या कामामुळे 9 फेब्रुवारी रोजी पालिकेच्या ‘एफ-उत्तर’ विभाग कार्यालयाच्या हद्दीतील शिवशंकर रोड, भारतीय कमला नगर, बीपीटी इमारत, किस्मत नगर, बंगालीपुरा, राजीव गांधी नगर परिसरातील; तर 10 फेब्रुवारी रोजी सी. जी. एस. वसाहत, अ‍ॅन्टॉप हिलमधील वर्धराज नगर, कामराज नगर, जय महाराष्ट्र नगर, गरीब नवाज नगर, बाबासाहेब आंबेडकर नगर, मोतिलाल नेहरू नगर, विजय नगर, भारतीय कमला नगर, चांदणी आगार, चिखलवाडी, संगम नगर, हिंदुस्थान नगर, शांती नगर, दीनबंधू नगर, गणेश नगर, शिवशंकर नगर, आनंदवाडी, आनंद नगर, करीम वाडी, नानाभाई वाडी, लक्ष्मण वाडी, मानूरवाडी, काले वाडी, लाल बहादूर शास्त्री नगर, गिरीधर तांबे नगर, रमामाता वाडी, महात्मा फुले वाडी, प्रियदर्शनी नगर, अग्रवाल वाडी, आचार्य अत्रे नगर, जयकर वाडी, बीमवाडी, चिंधी गल्ली, प्रवेशद्वार क्रमांक 5, कोकरी आगार, एम. ए. मार्ग, पंजाबी बसाहत, जे. के. भसीन मार्ग येथील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.हेदेखील वाचा- मुंबई मधील हॉटेल, बार, रेस्टोरेंट्स आणि फुड कोर्ट रात्री 1 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी

तर एफ-दक्षिण विभागातील दादर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग व जगन्नाथ भातनकर मार्ग, बी. जे. देवरुखकर मार्ग, गोविंद केणी मार्ग, हिंदमाता, लालबाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिवडा गल्ली, डॉ. एस. एस. राव मार्ग, दत्ताराम लाड मार्ग, जिजीभॉय गल्ली, महादेव पालव मार्ग, साने गुरुजी मार्ग, गॅस कॉलनी परिसरात कमी दाबाने पुरवठा होईल.

(The above story first appeared on LatestLY on Feb 07, 2021 05:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).