Water Cut in New Mumbai: मुंबईकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार! नवी मुंबईतील 'या' भागांचा 8 जूनपासून पाणीपुरवठा विस्कळीत

याशिवाय जिते येथील जलशुद्धीकरण केंद्रातील हेटवणे धरणाच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे.

Water Cut | Representational & Edited Image (Photo Credits: Pixabay)

Water Cut in New Mumbai: नवी मुंबईतील (New Mumbai) काही भागांचा पाणीपुरवठा (Water Supply) 8 जून रोजी विस्कळीत होणार आहे. कारण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी (Maharashtra State Electricity Transmission Company) देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी 24 तास शटडाऊन करणार आहे. MSETC 22KV CIDCO आणि 22KV MSETCL वर हमरापूर फीडर मुख्य लाईनवर काम करत आहे.

द्रोणागिरी, उलवे, खारघर आणि तळोजा फेज 2 नोड्समध्ये 9 जून रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत पाणीकपात लागू राहणार आहे. याशिवाय जिते येथील जलशुद्धीकरण केंद्रातील हेटवणे धरणाच्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. दरम्यान, सिडकोने नागरिकांनी पाण्याची साठवणूक करून काटकसरीने पाणी वापरण्याचे आवाहन केलं आहे. (हेही वाचा - Kolhapur News: वादग्रस्त पोस्टवरुन हिंदू संघटना आक्रमक; कोल्हापूर मुस्लिम समाजाकडून कारवाईची मागणी, पोलिसांनी काढले बंदी आदेश)

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा सुरू होणार आहे. खारघर: सेक्टर 1,2,8,10,14,19, आणि 20 मध्ये 9 जून रोजी सकाळी 6 वाजता पाणीपुरवठा पुन्हा सुरू होईल. त्याचप्रमाणे सेक्टर 3,4,5,6,7,11,12,13 मध्ये 21,22 आणि 23 मध्ये रात्री 8.00 वाजल्यापासून तर सेक्टर 15,16,17, आणि 18 ला दुपारी 3.00 वाजल्यापासून पाणीपुरवठा केला जाईल. उर्वरित सेक्टर 30 ते 40 मध्ये सकाळी 8 वाजेपासून पाणी मिळेल.

द्रोणागिरी आणि उलवे: द्रोणागिरी नोडला 9 जून रोजी सकाळी 6 वाजल्यापासून तर उलवे नोडमधील सेक्टर 2,3,5,8,9,10,15,16,17 आणि 18 ला सायंकाळी 5.30 वाजेपासून पाणीपुरवठा होईल. त्याचप्रमाणे उलवे नोडमधील सेक्टर 19,20,21,23,24 आणि 25 मध्ये रात्री 12 वाजल्यापासून पाणीपुरवठा करण्यात येईल.

दरम्यान, भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रातील तातडीच्या दुरुस्तीच्या कामांसाठी नवी मुंबई महापालिकेने आज 12 तासांची पाणीकपात केली आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif