IPL Auction 2025 Live

'अन्यथा काँग्रेस महाविकास आघाडीतील सर्वात तोट्याचा पक्ष ठरेल' विनायकराव देशमुख यांचा कार्यकर्त्यांना इशारा

माजी महापौर जावेद दळवी यांच्यावर नाराज झालेल्या भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या (Congress) 18 बंडखोर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

Congress flags | Representational Image | (Photo Credits: PTI)

माजी महापौर जावेद दळवी यांच्यावर नाराज झालेल्या भिवंडी महापालिकेतील काँग्रेसच्या (Congress) 18 बंडखोर नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला आहे. या पक्षप्रवेशाने शहरात काँग्रेसची ताकद कमी झाली असून राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस विनयकराव देशमुख (Vinayakrao Deshmukh) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून कार्यकर्त्यांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर देशमुख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रातून आपली खदखद व्यक्त केली आहे. दरम्यान ते म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारचा एक भागीदार आणि त्यातून मिळालेली काही मंत्रीपदे, एवढ्यावर समाधानी राहून चालणार नाही. सरकारमध्ये काँग्रेसचाही सहभाग आहे, हे काँग्रेसच्या हितचिंतकांनी, कार्यकर्त्यांनी जाणवायला हवे आहे. तसेच भिवंडीतील 18 नगरसेवकांचा राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. हा केवळ एक योगायोग नव्हे, असा आरोप त्यांनी केला आहे. याशिवाय, काँग्रेसच्या नेत्यांनी वेळीच सावध न झाल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. हे देखील वाचा- Devendra Fadnavis On CM Uddhav Thackeray, Ajit Pawar: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली- देवेंद्र फडणवीस

ट्वीट-

भिवंडी महापालिकेच्या 2017 मध्ये झालेल्या निवडणुकीत 90 जागांपैकी कॉंग्रेसने 47 जागांवर विजय मिळवला होता. तर, भाजपने 20, शिवसेनेने 12, कोणार्क आघाडी 4, रिपब्लिकन पक्षाने 4, समाजवादी पक्षाला 2 आणि 1 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे कॉंग्रेसने 2017 मध्ये शिवसेनेच्या मदतीने काँग्रेसने महापौरपद मिळवले होते.