Wada Police Seize Rs 3.70 Crore: पालघर जिल्ह्यात 3.70 कोटी रुपयांची रोकड जप्त; वाडा पोलिसांची कारवाई

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीदरम्यान पालघर जिल्ह्यातील वाडा पोलिसांनी एका कारमधून 3.7 कोटी रुपये रोख जप्त केले. निधीचा उद्देश आणि मूळ तपासण्यासाठी तपास सुरू आहे.

Indian Rupee | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी (Maharashtra Vidhansa Election 2024) आचारसंहितेची अंमलबजावणी (Code of Conduct) करण्याच्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून केल्या जाणाऱ्या कार्यवाहीवेळी वाडा पोलीसांना तब्बल 3.7 कोटी रुपयांची रक्कम सापडली आहे. ऐरोली, नवी मुंबई येथून विक्रमगडला जाणाऱ्या वाहनातून शनिवारी (9 नोव्हेंबर) ही रोख रक्कम जप्त करण्यात आली. वाडा पोलीस (Wada Police) आचारसंहितेचा भाग म्हणून नाक्यावरील आणि इतर ठिकाणीही संशयीत वाहनांची तपासणी करत होते. या वेळी पालघर (Palghar) जिल्ह्यातील वाडा जवळ अडवण्यात आलेल्या वाहनात रोख रक्कम मोठ्या प्रमाणात आढळून आली. ज्या वाहनाकडे इतक्या मोठ्या रकमेच्या वाहतुकीची पडताळणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे नव्हती. पोलिसांनी सध्यास्थितीत ही रक्कम जप्त केली असून पुढील तपास सुरु आहे.

रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी असल्याचा दावा

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, ज्या वाहनातून ही रक्कम जप्त केली ते वाहन नवी मुंबईतील ऐरोली येथून पालघर जिल्ह्यात विक्रमगडच्या वाडा येथे निघाले होते. हे वाहन म्हणजे चारचाकी कार होती. गाडीची मालकी असलेल्या कंपनीने ही रोख रक्कम एटीएममध्ये भरण्यासाठी असल्याचा दावा केला असला तरी, या मोठ्या रकमेसाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात त्यांना सादर करता आली नाहीत. परिणामी आदर्श आचारसंहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार आम्ही रोख रक्कम जप्त केली, असे वाडा पोलीस अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सांगितले. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024: लोकसभा निवडणुकीच्या काळात आयकराने विभागाने जप्त केली 1,100 कोटी रुपयांची रोख रक्कम आणि दागिने; 2019 तुलनेत यंदा 182 टक्क्यांनी वाढ)

जप्ती आणि निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीची पार्श्वभूमी

विधानसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (एमएमआर) च्या अलीकडील अहवालांनंतर ही जप्ती झाली आहे, जिथे अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसांत एकूण 7.3 कोटी रुपयांची रोख रक्कम तसेच निवडणुकीशी संबंधित इतर साहित्य जप्त केले आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी नवी मुंबईतील कोपरखैरणे येथे आणखी एक वाहन अडवले होते, ज्यात ऐरोलीचे अपक्ष उमेदवार विजय चौगुले यांचे पोस्टर होते. चौगुले हे 'प्रेशर कुकर' च्या चिन्हाखाली निवडणूक लढवत आहेत आणि जप्त केलेले प्रेशर कुकर हे निवडणुकीसाठी मोफत दिलेले होते का याचा तपास अधिकारी करत आहेत. (हेही वाचा: RBI's Balance Sheet Larger Than Pakistan's GDP: आरबीआयचा ताळेबंद पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेपेक्षा 2.5 पट जास्त; पोहोचला 70.48 लाख कोटी रुपयांवर)

पालघर जिल्ह्यात पोलिसांची मोठी कारवाई

दरम्यान, सर्व रोखड आणि साहित्य देवाणघेवाण एमसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करत असल्याचे सुनिश्चित करून निवडणूक आयोगाने आपले देखरेख उपक्रम अधिक व्यापक केले आहेत. या किंवा संबंधित प्रकरणांमध्ये निवडणुकीचे उल्लंघन झाले आहे की नाही हे निर्धारित करण्यासाठी तपास सुरू आहे. दरम्यान, आणखी एका कारवाईत मीरा-भाईंदर-वसई-विरार (MBVV) पोलिसांनी येत्या 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी नाकाबंदी मोहिमेदरम्यान गुरुवारी तीन वाहनांमधून 5 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली आहे.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now

Share Now