Real-Time Polling Booth Updates In Navi Mumbai: नवी मुंबईमध्ये मतदान केंद्र कुठे ते सध्या बुथ वर गर्दी किती? 'या' लिंक वर सारी माहिती मिळणार एका क्लिकवर

त्यामुळे मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर न येण्याचं आवाहन केले आहे आणि आणला असल्यास तो लॉकर मध्ये ठेवावा लागणार आहे.

Polling Booths | Wikipedia

महाराष्ट्रामध्ये विधानसभेसाठी (Maharashtra Vidhan Sabha Election)  20 नोव्हेंबरला यंदा मतदान होणार आहे. अधिकाधिक मतदारांनी यामध्ये सहभागी व्हावं यासाठी वारंवार प्रयत्न केले जातात. यंदा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणूकांसाठी नवी मुंबई पोलिसांकडून (Navi Mumbai Police) मतदारांना त्यांचा हक्क बजावण्यासाठी प्रक्रिया सुकर व्हावी यासाठी विशेष लिंक आणि QR code ची सुविधा दिली आहे. नवी मुंबई मध्ये मतदार ज्यांना आपलं मतदान केंद्र कुठे आहे याची माहिती नाही त्यांना या लिंकवरून मतदान केंद्राची रिअल टाईम माहिती मिळणार आहे. यामध्ये पोलिंग बुथ नेमकं कुठे आहे? त्या ठिकाणी पार्किंगची सोय आहे का? कुठे आहे? बुथ वर गर्दी कितपत आहे? तसेच मोबाईल ठेवण्याची व्यवस्था याची माहिती दिली जाणार आहे. दरम्यान ही सेवा केवळ नवी मुंबई पुरती असल्याने ऐरोली, बेलापूर, पनवेल आणि उरण मधील मतदान केंद्रांची यामध्ये माहिती मिळणार आहे.

Deputy Commissioner of Police (Zone I) Pankaj Dahane, यांनी दिलेल्या माहितीनुसार, नवी मुंबई मध्ये सर्व मतदान केंद्रांवर लॉकर फॅसिलिटी असणार आहे. ही सुविधा देण्यामागील पोलिसांचा उद्देश हा स्वेच्छेने अधिकाधिक मतदार मतदान केंद्रावर पोहचावेत हा आहे. How to Check Name in the Voter List: मतदार यादीत आपले नाव कसे तपासावे? घ्या जाणून .

मतदान केंद्राची रिअल टाईम माहिती कुठे मिळणार?

www.navimumbaipolice.gov.in/guide-to-polling या लिंकवर मतदारांना माहिती मिळणार आहे. यामध्ये युजर्स नी लिंक वर क्लिक केल्यानंतर निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर त्यांना रिडिरेक्ट केले जाईल. मतदार संघ आणि पोल बुथ ची माहिती टाकल्यानंतर त्यांना मतदान केंद्राचा पत्ता, पार्किंग व्यवस्था आणि सध्या बुथ वर किती गर्दी आहे? याची माहिती मिळणार आहे. तसेच लॉकर सेवा कशी आहे याची माहिती देखील एका व्हिडिओ द्वारा दिली आहे.

मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या परिसरामध्ये मोबाईल फोन नेण्याला प्रतिबंध घालण्यात आला आहे. त्यामुळे मोबाईल घेऊन मतदान केंद्रावर न येण्याचं आवाहन केले आहे आणि आणला असल्यास तो लॉकर मध्ये ठेवावा लागणार आहे. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.