विनोद निकोले आहेत सर्वात गरीब आमदार; त्यांची एकूण संपत्ती ऐकून तुम्हालाही वाटेल आश्चर्य

पण यावेळी निवडून आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार विनोद भिवा निकोले हे त्याला अपवाद ठरले आहेत.

Vinod Nikole (Photo Credits: Facebook)

विधानसभा निवडणूक लढवणारे राज्यातील बहुतांशी उमेदवार हे कोट्याधीश असतात. पण यावेळी निवडून आलेले मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे डहाणू विधानसभा मतदारसंघातील आमदार विनोद भिवा निकोले हे त्याला अपवाद ठरले आहेत.

विनोद निकोले हे कोट्याधीश नसून ते ठरले आहेत महाराष्ट्रातील आमदारांपैकी सर्वात गरीब उमेदवार. त्यांच्याकडे फक्त 51 हजार 82 रुपयांची रोकड आहे. इतकंच नाही तर त्यांना राहण्यासाठी स्वतःच्या मालकीचं घर सुद्धा त्यांच्याकडे नाही. डहाणू तालुक्यातील उर्से हे खेडेगाव म्हणजेच त्यांचे मुळगाव आहे व अतिशय गरीब कुटुंबात निकोले यांचा जन्म झाला. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना मोलमजुरी करुन शिकवले.

घरातील खर्च चालवण्यासाठी विनोद हे डहाणूच्या इराणी रोडवरील वैभव कॉम्प्लेक्सच्या आवारात टपरी टाकून वडापाव आणि चहाविक्री करायचे. आणि त्यांच्या याच टपरीवर चहा-नाश्त्यासाठी माकपचे बुजूर्ग कॉम्रेड एल बी धनगर यायचे. एके दिवशी धनगर यांनी विनोद यांना माकपचं सदस्य करुन घेतलं होतं.

2003 साली त्यांना माकपचं सदस्यत्व मिळालं आणि 2006 पासून त्यांनी पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून कामाला सुरुवात केली. दरमहा फक्त 500 रुपये मानधनावर त्यांनी मार्क्सवादी कम्युनिस्टचे पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधानसभा निवडणुकीत अशा पद्धतीने मिळवले यश 

आणि अशा रीतीने विनोद यांनी भाजपचे मातब्बर उमेदवार धनारे यांचा पराभव करुन थेट विधानसभा गाठली व निवडणूक जिंकण्यासाठी पैसाच असणे गरजेचे नाही हे दाखवून दिले.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif