नववर्षाच्या निमित्ताने गडकिल्ल्यांवर अनुचित प्रकार घडू नये म्हणून तळीरामांवर ग्रामस्थांनीच आणली 'बंदी'; कोणती आहेत ही ठिकाणे
'नववर्षाच्या पूर्वसंध्येला हरिश्चंद्रगड, माहुली, प्रबळमाची आदी किल्ले बंद करण्यात येणार असून कृपया कोणीही दोन दिवस या किल्ल्यांच्या आजूबाजूला फिरकू नये', अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.
नववर्षाच्या सेलिब्रेशनचे एव्हाना सर्वांचे प्लान्स ठरले असतील. यात थर्टी फर्स्ट (31st Night) कुठे पार्टी करायची याचे आखणी होत असेल. 31st म्हणजे तळीरामांचा आणि हुल्लडबाजी करणा-या लोकांचा जिव्हाळ्याचा विषय. अशा वेळी थंडीत थर्टी फर्स्टची मजा अनुभवण्यासाठी असे लोक शक्यतो निसर्गाचा आधार घेतात. याता गडकिल्ले अनेकांचे लक्ष्य असते. म्हणून आधीच खबरदारी घेऊन ग्रामस्थांनी अशा गडकिल्ल्यांवर तळीरामांना बंदी घातली आहे. महाराष्ट्राची शान असलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धनासाठी वन विभागाने बंदी घालण्यापूर्वी काही गडकिल्ल्यांजवळच्या ग्रामस्थांनीच किल्ल्यांवर बंदीचे शस्त्र उगारले आहे. 'नववर्षाच्या पूर्वसंध्येला हरिश्चंद्रगड, माहुली, प्रबळमाची आदी किल्ले बंद करण्यात येणार असून कृपया कोणीही दोन दिवस या किल्ल्यांच्या आजूबाजूला फिरकू नये', अशा आशयाचे संदेश सोशल मीडियावर फिरत आहेत.
नववर्षाच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेले थर्टी फर्स्ट चे सेलिब्रेशन दणक्यात करण्याचे प्रत्येकजण प्रयत्नात असतो. यात सर्वात जात ऊत येतो तळीरामांना. नुसते मद्यपान करणे, धिंगाणा करणे हेच म्हणजे थर्टी फर्स्ट असे त्यांचे समीकरण झाले आहे. अशा तळीरामांवर कारवाईचा बडगा म्हणून या गडकिल्ल्याच्या परिसरात राहणा-या ग्रामस्थांनी आधीच बंदीच घातली आहे.
हेदेखील वाचा- Christmas-New Year: ..तर ख्रिसमस, नव वर्षांच्या पार्ट्यांमध्ये फिल्मी, गैरफिल्मी गाणी वाजवता येणार नाहीत: उच्च न्यायालय
हा प्रकार दरवर्षी अनेक गडकिल्ल्यांच्या परिसरात झालेला पाहायला मिळतो. यामुळे येथील ग्रामस्थही त्रस्त होतात. शिवाय शिवकालीन गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी वनविभागाकडून अनेक गडकिल्ल्यांवर विशेष बंदी घालण्यात येते. मात्र यंदा वन विभागाकडून अजून तरी कोणताही निर्णय जाहीर न केल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन समाजसेवेचा विडा उचलला आहे.
तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारतर्फे या मंडळींना एक न्यू इयर गिफ्ट देण्यात आलं आहे. प्राप्त माहितीनुसार, नवीन वर्षाच्या रात्री म्हणजेच 31 डिसेंबर ला राज्यातील मद्य विक्री (Alcohol Selling) दुकाने पहाटे 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी सरकारने दिली आहे. असं असलं तरी यादिवशी खरेदी करताना ग्राहकांनी सतर्क राहावे असे आवाहन सरकारने केले आहे, या दिवसांची मागणी पाहता अनेक परवाना विना चालणाऱ्या दुकानात नकली आणि भेसळयुक्त माल विकला जातो त्यामुळे केवळ अधिकृत दुकानातूनच खरेदी करावी अशी सूचना करण्यात आली आहे.